Saturday , September 21 2024
Breaking News

कर्नाटक

स्मृतिदिनाच्या जेवणावळीला फाटा; पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम

  निपाणी (वार्ता) : येथील आऊबाई काशिनाथ मेस्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त जेवणावळीला फाटा देऊन सेवानिवृत्त मंडल अधिकारी राजकुमार मेस्त्री आणि ॲड. दिलीप मेस्त्री परिवारातर्फे अर्जुनी येथे वृक्ष लागवड करून पर्यावरण पूरक उपक्रम राबविला. यावेळी २५ हजार रुपयांची बारा फूट रोपे जेसीबीने खड्डे काढुन लावण्यात आली. याशिवाय उन्हाळा संपेपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करून …

Read More »

खानापूर समितीकडे निरंजन सरदेसाई, रणजित पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातून खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढविणार असल्याने इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यानुसार आज खानापूर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष व स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई व समितीचे सदस्य हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजित पाटील या दोघांनी आपला अर्ज समितीकडे सादर केला आहे. …

Read More »

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात समितीचा उमेदवार देण्यासंदर्भात चर्चा

  महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक संपन्न निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक काल कुर्ली येथे युवा समिती अध्यक्ष बंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सुरवातीला बैठकिचा उद्देश युवा समिती कार्याध्यक्ष अजित पाटील यांनी सविस्तर सांगितला. होऊ घातलेली लोकसभा निवडणूक ही अतिशय महत्वाची असून, मराठी …

Read More »

घरगुती वापरासाठीच्या विज दरात प्रति युनिट १.१० रुपये कपात

  आजपासून प्रभावी; १५ वर्षात प्रथमच वीज दरात कपात बंगळूर : राज्यात पंधरा वर्षांनंतर प्रथमच वीज वापर दरात कपात करण्यात आली आहे. दर कपात आजपासून लागू होणार असून मे महिन्यात देण्यात येणाऱ्या बिलाना ती लागू होणार आहे. कर्नाटक वीज नियामक आयोगाने (केईआरसी) गेल्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये वार्षिक कार्यवाही केली आणि …

Read More »

दत्तवाडीतील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले

  दुचाकीस्वारांच्या घिरट्या : महिलांच्यात घबराहाट कोगनोळी : मागील काही दिवसांपासून कोगनोळी परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळ्या चोऱ्यांचे प्रकार भामट्या दुचाकीस्वारांकडून पुन्हा सुरू झाले आहेत. रविवारी दुपारी चारच्या सुमारास दत्तवाडीतील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी हिसकावून पळ काढला. याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तवाडी तालुका निपाणी येथील …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांचा पट्टा पडला!

  गाळप आणि साखर उत्पादनात जवाहर कारखाना आघाडीवर कोगनोळी : नजिकच्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून सात साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. जिल्ह्यातील अथर्व इंटर ट्रेड, हमिदवाडा सदाशिवराव मंडलिक, गडहिंग्लज, बांबवडे, तांबाळे, संताजी घोरपडे, इको केन चंदगड या सात साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली …

Read More »

रयत संघटना राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी घेतली मनोज जरांगे -पाटील यांची भेट

  मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या समस्यावर चर्चा निपाणी (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत होणाऱ्या अन्यायासह मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि देशातील शेतकऱ्यांच्यावर होत असलला दूर करण्यासाठी …

Read More »

हिंडलगा कारागृहावर पोलिसांचा अचानक छापा

  बेळगाव : बेळगाव येथील हिंडलगा कारागृहावर पोलीस अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून तपासणी केली आहे. डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला असून डीसीपीला बेळगावच्या 5 विभागाचे एसीपी, सीपीआय यांचे सहकार्य लाभले आहे. हिंडलगा कारागृहात अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर हा छापा घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कारागृहातील अवैध धंदे रोखण्यासाठी …

Read More »

जनावरांना चारा वाटपास प्रारंभ

  रयत संघटनेच्या मागणीची दखल; प्रत्येक शेतकऱ्याला २० किलो चारा निपाणी (वार्ता) : निपाणी आणि चिक्कोडी तालुक्यात उन्हाळ्यात चारा आणि पाण्याची टंचाई भासत आहे. याबाबत रयत संघटने तर्फे तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनातर्फे बेळकुड येथून शेतकऱ्यांना चारा देण्यास प्रारंभ करण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्याला २० …

Read More »

केंद्रात काँग्रेस सत्तेची गरज : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

  निपाणीत काँग्रेस मेळावा निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या जाहीर नाम्यातील पाचही योजना अंमलात आणल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आधार लागला आहे. केंद्रात सत्ता आल्यास आणखीन नवनवीन योजना राबवू, असे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.२९) मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात काँग्रेस पक्षा …

Read More »