खानापूर : मणतुर्गे (ता. खानापूर) येथे गुढीपाडव्या निमित्त श्री रवळनाथ मंदिराच्या चौकटीचे आगमन सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता श्री सातेरी माउली मंदिर येथे झाले. नुतन चौकटीचे औक्षण गावांतील वतनदार सौ. व श्री. नागेश विठ्ठल पाटील, सौ. व श्री. ज्योतिबा दत्तू गुरव, सौ. व श्री. …
Read More »दूध, दही, वीज दरात आजपासून वाढ
बंगळूर : राज्यातील जनतेला आज (ता.१) पासून दरवाढीचा फटका बसणार आहे. नंदिनीचे दूध, दही आणि वीजेचे दर आणखी महाग होतील. बस आणि मेट्रोचे भाडे आधीच जास्त असल्याने,आजपासून ग्राहकांच्या खिशाला आणखी फटका बसणार आहे. ऊर्जा विभागाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅच्युइटीमध्ये प्रति युनिट ३६ पैशांची वाढ केली आहे. दुसरीकडे, सरकारने नंदिनी …
Read More »….अन् न्यामती बॅंक दरोड्यातील सोने सापडले तमिळनाडूतील विहिरीत
सोन्याचे दागिने पाहून पोलिसही झाले थक्क बंगळूर : तामिळनाडूतील मदुराई येथील एका विहिरीत शेकडो चेन, नेकलेस, ब्रेसलेट, अंगठ्या, ताली चेन आणि ब्रेसलेटसह एकूण १७ किलो सोने सापडले आहे. विशेष म्हणजे हे सर्व सोन्याचे दागिने दावणगेरे येथील न्यामती बँक दरोडा प्रकरणातील असल्याचे समजते. तामिळनाडूतील एका विहिरीत सापडलेले १७ किलो सोने …
Read More »सणाच्या दिवशी शोकांतिका; कृष्णा नदीत बुडून तीन मुलांचा मृत्यू
बागलकोट : गुढीपाडवा सणाच्या दिवशी कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली. तिघेही बागलकोट तालुक्यातील इल्याळ गावातील रहिवासी आहेत. बागलकोट जिल्ह्यातील सीतीमनी गावात ही दुर्घटना घडली. सोमशेखर बोमण्णा देवरमनी (वय १५) याचा मृतदेह सापडला असून मल्लप्पा बसप्पा बगली (वय १५), परनगौडा मल्लप्पा बिळगी …
Read More »हुतात्मा भवन भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे खानापूर समितीचे आवाहन
खानापूर : स्मारकाच्या जागे मध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने हुतात्मा भवन उभारणी करण्यात येणार आहे. याचा भूमिपूजन सोहळा ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रसिद्ध सिव्हिल इंजीनियर आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन होणार …
Read More »बसनगौडा यत्नाळांची हकालपट्टी मागे घेण्याचा असंतुष्ट गट करणार मागणी
यत्नाळ गटाची बंगळूरात महत्वपूर्ण बैठक; संघर्ष वाढण्याची चिन्हे बंगळूर : भाजपचे हकालपट्टी केलेले आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी आज भाजपमधील असंतुष्ट गटाची बैठक घेऊन उत्सुकता निर्माण केली आहे. वरिष्ठांनी स्पष्टपणे निर्देश दिले होते की यत्नाळसोबत बैठका घेणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तरीही, असंतुष्टांनी बैठक घेऊन वरिष्ठांना थेट आव्हान दिले …
Read More »कोडगुमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या
बंगळूर : कोडगू जिल्ह्यातील पोन्नमपेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका जोडप्याची आणि त्याच कुटुंबातील आई आणि मुलीची प्राणघातक शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. मृतांची ओळख पटली असून बोगुरू गावातील करिया (वय ७५), गौरी (वय ७०), या जोडप्यासह नागी (वय ३०) आणि तिची मुलगी कावेरी (वय ५) अशी …
Read More »डिजिटल अटकेच्या भीतीने दाम्पत्याने संपविले जीवन; बिडी येथील धक्कादायक घटना
खानापूर : सायबर गुन्हेगारांनी व्हिडिओ कॉलवरून नग्न फोटो असल्याचे सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याने एक वृद्ध दाम्पत्य आत्महत्येस प्रवृत्त झाल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील बिडी येथे घडली आहे. वृद्ध रेल्वे निवृत्त कर्मचारी डिएगो नझरेथ (83) आणि त्यांची पत्नी पाविया नझरेथ (79) यांनी आत्महत्या केली. गेल्या महिन्याभरापासून हे दाम्पत्य सायबर …
Read More »उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी विमान वाहतूकसंबंधित सुविधा वाढवावी : मंत्री सतीश जारकीहोळी
नवी दिल्ली : केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री किंजरापू राम मोहन नायडू आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी भेट घेऊन उत्तर कर्नाटकातील विमान वाहतूकसंबंधित सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. बेंगळुरूमधील देवनहळ्ळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर होत असलेल्या गर्दीमुळे …
Read More »खानापूर येथील एका हॉटेल आवारातील कुत्र्याच्या हल्ल्यात एक जखमी
खानापूर : खानापूर शहरातील एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये शहापूर येथील विनायक मेलगे (वय वर्षे 40) हे जेवणासाठी गेले होते. त्यांच्यावर त्याच हॉटेलच्या आवारात बसलेल्या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना 23 मार्च रोजी रात्री खानापूर -गोवा मार्गावरील एका नामांकित हॉटेल आवारात घडली आहे. सदर घटनेनंतर जखमी विनायक यांना त्याच्याच नातेवाईकांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta