Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

बोरगाव मधील पाटील बंधूंनी घेतली माजी मंत्री शरद पवार यांची भेट

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकाररत्न उत्तम पाटील आणि अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांनी मुंबई येथे माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार शरद पवार यांची भेट घेतली. नवी मुंबईतील पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी निपाणी तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात …

Read More »

चित्रदुर्गजवळील महामार्गावर भीषण अपघात; बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू

  चित्रदुर्ग : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हिरियुर तालुक्यातील गोरलट्टू गावाजवळ एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. ज्यामध्ये एका बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही खासगी बस बेंगळुरूहून गोकर्णाकडे जात होती. दरम्यान, रात्री उशिरा विरुद्ध दिशेनं येणारी एक लॉरी डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. …

Read More »

कृषीधन दुध संघाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रमासह शर्यतींचे आयोजन

    टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष निकू पाटील यांची माहिती निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरातील दूध उत्पादक शेतकरी व ग्राहकांच्या पाठबळावर सन २०११ साली सचिन काटकर, बाळासाहेब पोवार, परशराम लोकरे यांनी सुरु केलेल्या कृषीधन दुध उत्पादक सहकारी संघाचा १४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने भव्य …

Read More »

अनुदानित शाळांच्या समस्या सोडवणुकीसाठी स्तवनिधी गुरुकुल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षणमंत्र्यांना भेट

  निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील शाळा नियुक्ती व प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांची बेळगाव येथे स्तवनिधी येथील बाहुबली विद्यापीठ संचलित गुरुकुल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह बेळगाव जिल्ह्यातील आमदार अभय पाटील यांच्यासह गुरुकुल संस्थेचे उपाध्यक्ष राजू पाटील, संचालक प्रदीप पाटील, डॉ. संतोष चौगुले महावीर पाटील यांच्या उपस्थितीत भेट घेऊन विविध मागण्यांचे …

Read More »

सैन्य दलात भरती होऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याने शिवराज सावंतचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : येथील धर्मवीर संभाजी चौकातील शहर रिक्षा असोसिएशनचे माजी सेक्रेटरी संदिप सावंत यांचे चिरंजीव शिवराज सावंत याची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. शिवाय त्याने वडिलांचे स्वप्न साकार केल्याबद्दल रिक्षा संघटनेतर्फे मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बाळासाहेब जासूद यांनी, शिवराज …

Read More »

शिस्त, जिद्द आणि संघभावनेचा उत्सव : मराठा मंडळ ताराराणी हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा दिमाखदार समारोप

  खानापूर : मराठा मंडळ ताराराणी हायस्कूल, खानापूर येथे २०२५–२०२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साहात, आनंदी वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत क्रीडेचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा हा क्रीडा महोत्सव उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. स्पर्धांची सुरुवात नेत्रदीपक पथसंचलन परेडने करण्यात आली. शाळेतील …

Read More »

बोरगावला उन्हाळ्यातही मिळणार मुबलक पाणी

  सहकाररत्न उत्तम पाटील; बोरगावमध्ये कुपलिका खुदाईचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : बोरगाव शहराला दरवर्षी उन्हाळ्यात किमान दोन महिने बोरगाव येथील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत होते. तरीही पट्टण पंचायतीच्या माध्यमातून त्यावर मात करून पाणीपुरवठा केला जात होता. पण भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेऊन शहरात सर्वच प्रभागात उन्हाळ्यातही मुबलक पाणीपुरवठा …

Read More »

बांगला देशातील हिंदूंची कत्तल थांबविण्यासाठी श्रीराम सेना कर्नाटकतर्फे तहसीलदारांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : बांगला देशात अल्पसंख्याक हिंदू बांधवावर अमानुष अत्याचार करून त्यांची हत्या केली जात आहे. या हत्या तात्काळ थांबविण्यासह संबंधितावर कारवाई करण्याची मागणी येथील श्रीराम सेना कर्नाटक संघटनेने केली आहे. १८ डिसेंबर २०२५ रोजी मयमनसिंग जिल्ह्यातील भालूका येथे दिपू चंद्र दास या २७ वर्षीय हिंदू युवकाची जमावाने खोट्या …

Read More »

मावळा ग्रुपची अजिंक्यतारा, तोरणा किल्ला गडकोट मोहीम शनिवारी होणार रवाना

  निपाणी(वार्ता) : निपाणी येथील मावळा ग्रुप संचलित पाचवी गडकोट मोहीमेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी मोहिमेसाठी ३०० पेक्षा अधिक मावळ्यांनी नोंदणी केल्याची माहिती ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने यांनी दिली. मावळा ग्रुपच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रुपचे सल्लागार उदय शिंदे म्हणाले, यंदा ही मोहीम किल्ले अजिंक्यतारा …

Read More »

गर्भवती मुलीची बापाने केली निर्घृण हत्या; हुबळीतील दुर्दैवी घटना

  हुबळी : प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापानेच सात महिन्यांची गर्भवती असलेल्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हुबळी तालुक्यातील इनाम वीरापूर गावात घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत मान्या पाटील (वय 20) या सात महिन्यांच्या गर्भवती तरुणीचा मृत्यू झाला आहे. मान्या हिने इनाम वीरापूर गावातील …

Read More »