Monday , September 21 2026
Breaking News

निपाणी नगरपालिका कर्मचारी संघटना अध्यक्षपदी लहु मधाळे, उपाध्यक्षपदी विजय कुरंगी यांची निवड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य नगरसेवा कर्मचारी संघाच्या अंतर्गत येणाऱ्या येथील नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी नगरपालिकेतील प्रथम दर्जा सहाय्यक लहू मधाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विजय कुरंगी, सचिवपदी राहुल कदम तर खजिनदारपदी नगरपालिकेची लेखा अधीक्षक नागेंद्र बहाद्दुरी यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आयुक्त पाटील म्हणाले, नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासह अडचणीच्या काळात सहकार्य करण्याची भावना नूतन पदाधिकाऱ्यांनी बाळगण्याचे आवाहन केले. नूतन अध्यक्ष लहू मधाळे यांनी निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. यावेळी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी आप्पासाहेब चव्हाण आणि बाळू घस्ते यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अभियंता डी. बी. पठाण, महसूल अधिकारी विवेक जोशी, सुनील कांबले, पर्यावरण अभियंता चंद्रकांत गुडन्नावर, विनायक जाधव, प्रवीण कणगले, विशाल लाटवडे, सागर मेस्त्री, उत्तम चव्हाण यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते. संपत कुरणे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *