Monday , September 21 2026
Breaking News

मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी प्रतिनिधींपदी लोकेश मुगळे याची निवड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचालित येथील मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सालची विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली होती. यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी आपला निवडणुकीचा हक्क बजावला.
मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे यांनी उद्घाटन करून आपला मतदान हक्क बजावला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले ओळखपत्र दाखवून मतदान केले. यामध्ये शिक्षकांनी निवडणूक अधिकारी म्हणून कार्य केले.
सर्व निवडणूक आधुनिक डिजिटल प्रणालीद्वारे पार पाडण्यात आली. यासाठी समाजशास्त्र विभागाच्या शिक्षिका दिपाली पाटील व कलावती मेनसे यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून लोकेश मुगळे व प्रांजळ झिनगे तसेच सहाय्यक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून वर्धन चौगुले व रिद्धी चौगुले यांची निवड झाली. निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधीनींनी निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *