Monday , September 21 2026
Breaking News

विद्यामंदिरची निपाणीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Spread the love

 

दहावी परीक्षेत इंग्रजी विषयात ९ गुणवंतांचा विक्रम; भूमी वात्सल्य फाउंडेशनतर्फे पारितोषिके

निपाणी (वार्ता) : विद्यामंदिर निपाणी शाळेच्या सन १९४४ पासूनच्या इतिहासात प्रथमच दहावी परीक्षेत इंग्रजी विषयात तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून नवा इतिहास रचला. या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी “भूमी वात्सल्य” फाउंडेशनतर्फे येथील साई चैतन्य लेटेक्स कॉलनीत प्रेरणादायी सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेवराव चौगुले, उपाध्यक्ष अण्णा घाटगे, संचालिका व इंग्रजी विषय शिक्षिका अपूर्वा चौगुले, कल्पना घाटगे आणि सचिन कौंदाडे यांच्या हस्ते प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला १ हजार रोख सन्मानपत्र आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे गुलाबाचे रोप प्रदान करून गौरविण्यात आले.
यामध्ये ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणारे सहा विद्यार्थी आणि ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणारे तीन विद्यार्थी अशा एकूण नऊ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये पृथ्वीराज साठे (९९ टक्के), प्राची कांबळे (९८ टक्के), प्रीती वाळके (९६ टक्के), श्रेया कांबळे (९५ टक्के), वैष्णवी शिंदे (९४ टक्के), पुष्पराज कांबळे (९२ टक्के), यासिन पठाण (८३ टक्के), लतिका कांबळे (८३ टक्के) आणि यश कांबळे (८२) टक्के यांचा समावेश आहे.
नामदेवराव चौगुले म्हणाले, विद्यामंदिर शाळेच्या १९४४ पासूनच्या इतिहासात इंग्रजी विषयात प्रथमच तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी इतके उज्ज्वल यश संपादन करून इतिहास घडविला आहे. या यशामागे इंग्रजी विषय शिक्षिका अपूर्वा चौगुले यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, मेहनत आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ महत्त्वाची आहे. भविष्यातही असेच यश विद्यार्थ्यांना मिळत राहो आणि अशाच सत्कार समारंभांचे आयोजन करण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळो अशी अपेक्षा व्यक्त केली.
सुरेश घाटगे यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर अधिक मोठी यशशिखरे गाठण्याचे आवाहन केले.इंग्रजी विषयात उल्लेखनीय यश मिळवून देणाऱ्या शिक्षिका अपूर्वा चौगुले यांचा गुणवंत विद्यार्थ्यांतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास‌ पालक, विद्यार्थी आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
सचिन कौंदाडे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *