Monday , September 21 2026
Breaking News

उप्पार गल्ली खासबाग येथे चिंचेचे झाड कोसळून चार घरे उद्ध्वस्त

Spread the love

 

बेळगाव : गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे बेळगाव शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खासबाग येथील उप्पार गल्लीत रविवारी एक प्रचंड चिंचेचे झाड मुळासकट उन्मळून पडल्याने चार घरांचे मोठे नुकसान झाले.

या घटनेत अनिल मुतकेकर, आनंद भादवणकर, एकनाथ भादवणकर आणि प्रशांत गोरले यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. झाड घरांवर कोसळल्याने घरातील किराणा सामान, कपडे तसेच इतर अत्यावश्यक वस्तू झाडाखाली दबून नष्ट झाल्या. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बेघर झालेल्या कुटुंबांची हाक

अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. डोक्यावरचे छप्परच कोसळल्याने या कुटुंबांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असून, आपल्या डोळ्यांसमोर कष्टाने उभारलेले घर उद्ध्वस्त झाल्याने त्यांनी हळहळ व्यक्त केली.

“आम्ही गरीब माणसं आहोत. कष्टाने बांधलेलं घर क्षणात उद्ध्वस्त झालं. आता राहण्यासाठी घर नाही आणि उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे,” अशी व्यथा बाधित कुटुंबीयांनी व्यक्त केली.

तातडीच्या मदतीची मागणी

सध्या निवाऱ्याविना आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कुटुंबांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करावेत तसेच योग्य आर्थिक मदत आणि तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बाधित नागरिक आणि स्थानिकांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *