Monday , September 21 2026
Breaking News

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा अनोखा उपक्रम; डॉक्टर, सीएंचा गौरव, ‘संपत्ती निर्मिती’वर मार्गदर्शन

Spread the love

 

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे “संपत्ती निर्मिती व संवर्धनाची कला” या विषयावरील माहितीपूर्ण परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट्स डे निमित्त शहरातील मान्यवर डॉक्टर तसेच एका सनदी लेखापालाचा विशेष सत्कार करून त्यांच्या समाजाप्रतीच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. समाजाच्या आरोग्य आणि आर्थिक व्यवस्थेला बळकटी देण्यात डॉक्टर व सनदी लेखापाल यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांनी सचिवीय अहवाल सादर करत क्लबच्या आगामी सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

सत्कार समारंभात डॉ. शोभा करीकट्टी, डॉ. स्मिता गुडगणट्टी, डॉ. स्मृती प्रधान, डॉ. कल्याणी कल्लट्टी, डॉ. रूपादेवी होसमठ तसेच सीए वीणा बेटगेरी यांचा त्यांच्या समर्पित सेवा, व्यावसायिक प्रामाणिकपणा आणि उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.

यानंतर प्रमुख वक्त्या सौ. अनीता कांबर्गी यांनी “संपत्ती निर्मिती व संवर्धनाची कला” या विषयावर मार्गदर्शन केले. आर्थिक नियोजन, योग्य गुंतवणूक, संपत्ती निर्मितीची प्रभावी तत्त्वे आणि पुढील पिढ्यांसाठी संपत्तीचे जतन याविषयी त्यांनी सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने माहिती दिली. त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्याख्यानानंतर क्लबतर्फे त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा रोटेरियन सविता वेसणे होत्या, तर सूत्रसंचालन रोटेरियन ऍड. दिव्या मुडीगौडर यांनी केले.

कार्यक्रमाला रोटेरियन लक्ष्मी चव्हाणी, रोटेरियन संध्या तिम्मापूर, रोटेरियन नेहा हुड्डार, रोटेरियन सविता हेब्बार, रोटेरियन सुजाता वस्त्रद, डॉ. अनुपमा कल्लोल, ऍड. नैना सुलतानपुरी तसेच युवा दर्पणचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आभार प्रदर्शन आणि स्नेहमेळाव्याने कार्यक्रमाची सांगता झाली. सेवा, व्यावसायिक उत्कृष्टता आणि समाजहितासाठीची बांधिलकी जपत रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने आयोजित केलेला हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *