Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

करंबळ परिसरात दहशत माजविणाऱ्या टस्करला वनविभागाकडून जेरबंद

  खानापूर : खानापूर तालुक्यातील करंबळ गावात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या “त्या” टस्कराला अखेर वनविभागाने जेरबंद केले. खानापूर तालुक्याच्या वनपरिक्षेत्रात वाढलेला वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी शिमोगा येथील तज्ञ हत्तींचे पथक खानापुरात दाखल झाले असता लागलीच वनविभागाने मोहीम हाती घेतली आणि हत्तीला पकडण्यात यश मिळवले. खानापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून …

Read More »

हुळंद प्रकरणातील तीन अधिकारी निलंबित

  खानापूर : खानापूर तालुक्यातील हुळंद गावातील 508 एकर जमिनीच्या प्रकरणात गंभीर भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस आल्याने तीन प्रमुख अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. किरणकुमार (एडीएलआर इनचार्ज), पत्थार (सर्वेयर सुपरवायझर इनचार्ज), आणि मुतगी (सर्वेयर) या अधिकाऱ्यांना त्यांनी चुकीचे कागद केल्याच्या आरोपाखाली निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. हुळंद गावातील सर्वेक्षण क्रमांक …

Read More »

पॉवर ट्रेलरमध्ये सापडून शेतकऱ्याचा मृत्यू

  खानापूर : आपल्या शेतात पावर ट्रेलरद्वारे काम करत असताना पॉवर ट्रेलर खाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी, सायंकाळी पाचच्या खानापूर तालुक्यातील चापगाव नजीक घडली. सदर दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव अशोक पुंडलिक पाटील (वय 60 वर्ष) आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती …

Read More »

सदलगा विभाग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मकरंद द्रविड, उपाध्यक्षपदी वैभव खोत यांची निवड

    चिक्कोडी : सदलगा विभाग पत्रकार संघाच्या वतीने सोमवार तारीख ६ जानेवारी रोजी शमनेवाडी येथील अमृत गार्डन येथे पत्रकार दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी मावळत्या अध्यक्षा लीना संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक सुभाष बदनीकाई, संतोष कामात, राजू कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत २०२५-२६ या वर्षासाठी अध्यक्ष, …

Read More »

निम्हन्समध्ये कर्नाटक प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी कार्यवाही करा : मुख्यमंत्र्यांची सूचना

  बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री शरणप्रकाश पाटील यांना राजीव गांधी वैद्यकीय विद्यापीठात जमा झालेला अतिरिक्त निधी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध करून द्यावा आणि निम्हन्समध्ये कर्नाटक प्रशासकीय सेवेतील अधिकारी भरतीसाठी पावले उचलण्याची सूचना केली. बेंगळुरू येथील मुख्यमंत्र्यांचे गृहकार्यालय कृष्णा येथे झालेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रगती …

Read More »

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीचे यश

    निपाणी (वार्ता) : हुसदुर्ग येथे खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये फाईट, पुमसे व स्पीड पंच असे तीन विभाग होते. त्यामध्ये निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी विविध प्रकारात यश मिळवले. स्पर्धेत विश्वजीत पटनशेट्टी, तिलक कोठडीया, समर्थ निर्मले, अर्णव बोरगावे, …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सहा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

  बंगळूर : नक्षल कार्यकर्त्या मुंडगारू लता यांच्यासह चार महिला आणि दोन पुरुषांसह सहा नक्षल सैनिकांनी आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. माओवादी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर राज्याच्या इतिहासात प्रथमच अशी घटना मुख्यमंत्र्यांचे गृह कार्यालय कृष्णा यांनी पाहिली आहे. बंदुकीचा मार्ग सोडून लोकशाहीच्या मार्गावर जाण्याच्या इराद्याने मुंडगारू लता यांच्या नेतृत्वाखालील सहा …

Read More »

निपाणी, अक्कोळमध्ये लोकायुक्तांची धाड

  १४ जणांचे पथक ; १२ तास चौकशी निपाणी (वार्ता) : येथील शहराबाहेरील पश्चिमेला असलेल्या आदर्शनगर आणि अक्कोळ येथे बेळगाव येथील लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.८) पहाटे धाड टाकली. अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक २९ मधील आदर्शनगर येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चव्हाण यांच्या फार्म हाऊससह त्यांच्या अकोळ येथील सासरवाडी मधील घरामधील चौकशी केली. …

Read More »

ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

  खानापूर : ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूल यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. तुकाराम हणमंतराव साबळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डीसीपी सी. वाय. पाटील, डीएसपी श्री. हिरेगौडर, बेळगाव येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. रवी इचलकरंजी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात शाळेच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने …

Read More »

खानापूर पीएलडी बँकेच्या चेअरमनपदी मुरलीधर पाटील यांची तिसऱ्यांदा निवड

  खानापूर : खानापूर पीएलडी बँकेच्या आज झालेल्या बैठकीत, मुरलीधर गणपतराव पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून बँकेच्या चेअरमन पदाची माळ तिसऱ्यांदा, त्यांच्या गळ्यात पडली आहे. त्यामुळे पीएलडी बँकेच्या चेअरमन पदाची हॅट्रिक त्यांनी साधली आहे. तर उपाध्यक्षपदी आमटे गावचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कसर्लेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली …

Read More »