श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे आयोजन; भारती झालेल्या जवानांचाही सत्कार निपाणी (वार्ता) : श्रीराम सेना हिंदुस्थानच्या येथील शाखेतर्फे आयोजित तालुकास्तरीय दुर्गबांधणी स्पर्धेत अक्कोळ येथील धर्मवीर संभाजी नगरातील शिवशंभू ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला. गळतगा येथील सार्थक संजय जाधव गळतगा आणि अक्कोळ येथील श्रावणी संदीप सदावर्ते यांनी विभागून द्वितीय क्रमांक पटकाविला. अक्कोळ छत्रपती …
Read More »हुळंद-कणकुंबी रस्त्यावर पट्टेरी वाघाचे दर्शन!
खानापूर : खानापूर तालुक्यातील अतिघनदाट अरण्य प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबोटी भागातील कणकुंबी नजीक, हुळंद-कणकुंबी रस्त्यावरुन दुचाकी प्रवास करणाऱ्या नागरिकांना भर दिवसा पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. परंतु नागरिकांनी न घाबरता आपल्या दुचाकी थांबवून सदर पट्टेरी वाघाची छबी व व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये टिपला आहे. त्यासाठी या भागातील नागरिकांनी सावधानता …
Read More »दोडहोसुर नजीक दुचाकीची झाडाला धडक; एक जागीच
खानापूर : दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दुचाकी आढळल्याने झालेल्या भीषण अपघातात रायबाग तालुक्यातील एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी खानापूर – पारीश्वाड मार्गावर, दोडहोसुर व यडोगा क्रॉस नजीक घडली आहे. सावंत निंगाप्पा शॅंडगे (वय …
Read More »एचएमपीव्ही व्हायरस कोविडसारखा पसरत नाही; आरोग्य विभागाची मार्गदर्शक तत्त्वे जारी
बंगळूर : राज्यात ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) चे दोन प्रकरणे आढळून आल्याने लोकांमध्ये गंभीर चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. हा विषाणू कोविड-१९ सारखा संसर्गजन्य नसल्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे राज्य सरकारने सोमवारी सांगितले. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने (डीएमई) जारी केलेल्या निवेदनात जोर देण्यात आला …
Read More »बंगळूरातील दोन मुलांना ‘एचएमपीव्ही’ संसर्ग
सरकार अलर्ट, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना बंगळूर : शेजारच्या चीनमध्ये एचएमपीव्ही संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर, बंगळूर शहरात देशात प्रथमच ८ महिन्यांच्या आणि तीन महिन्यांच्या मुलामध्ये विषाणू दिसून आला आहे. त्यामुळे भितीचे वातावरण आहे. आठ महिन्यांच्या बालकाला काही दिवसांपूर्वी ताप आल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्त …
Read More »गणेबैलनजीक दुचाकी अपघात; एकाचा मृत्यू
खानापूर : खानापूर-बेळगाव महामार्गावरील गणेबैल नजीक, हत्तरगुंजी गावच्या हद्दीत असलेल्या मार्गावर काल रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4.45 वाजता दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेला दुचाकी चालक विक्रम मारुती पाटील (वय 33) बादरवाडी (बेळगाव) याचा आज सोमवार दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6.00 वाजता …
Read More »खानापूर ‘क्रांती सेना’, ‘समृद्धी’ सोसायटी विरुद्ध ठेवीदारांची तक्रार
बेळगाव : खानापूर येथील क्रांती सेना को-ऑप. सोसायटी आणि समृद्धी को-ऑप. सोसायटी या दोन पतसंस्थांच्या कारभाराची चौकशी करून या दोन्ही पतसंस्थांकडून सर्वसामान्य व गरीब ठेवीदारांच्या थकीत असलेल्या ठेवी त्यांना परत मिळवून द्याव्यात, अशी मागणी खानापूर येथील श्रीराम सेना हिंदुस्थान आणि आंबेडकर युवा मंच यांनी तहसीलदारांकडे केली आहे. श्रीराम सेना …
Read More »लक्ष्मीकांत पाटील यांचा मुरगुड येथे सत्कार
निपाणी : लोकनेते स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल, मुरगुड यांच्यावतीने, मा. खासदार संजयदादा मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव, सीमाभाग संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बेळगाव सीमाप्रश्नाच्या दिर्घ अंदोलनाला नव्याने चालना देण्यासाठी आणि …
Read More »समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांची महत्त्वाची भूमिका
प्रा. डॉ. अच्युत माने; निपाणीत पत्रकार दिन निपाणी (वार्ता) : पत्रकार हा समाजातील आरसा असतो. त्याच्याकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. बातमी मागील बातमी काढण्याची आता गरज निर्माण झाली आहे. देशात वाढलेल्या राजकतेवर अंकुश ठेवण्यासाठी आता लेखणी करावी लागेल. त्यामुळे समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत …
Read More »संभाजीनगर रस्त्यावरील अतिक्रमण पालिकेने हटवले
संबंधित कुटुंबीयांना जागेची हकपत्र; ४० वर्षानंतर समस्येचे निराकरण निपाणी (वार्ता) : शहरात उपनगरांच्या माध्यमातून दिवसेंदिवस व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाले आहेत. येथील देवचंद महाविद्यालय परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्यावर अतिक्रमण करून घर बांधण्यात आले होते. अनेक वर्षांपासून नागरिकांना मुख्य रस्त्यापासून दूर राहावे लागले होते. अखेर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta