Friday , December 19 2025
Breaking News

देश/विदेश

मी मोदींचा छोटा शिपाई : हार्दिक पटेल यांचा भाजपमध्ये प्रवेश

अहमदाबाद : काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी आज (दि.२) भाजपमध्ये १५ हजार समर्थकांसह प्रवेश केला. मी पंतप्रधान मोदींचा छोटा शिपाई, अशी भावना हार्दिक पटेल यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली. मी आजपासून एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी काम करेन, असे ट्विट त्यांनी केले आहे. …

Read More »

केंद्र सरकार काश्मिरी पंडितांचं रक्षण करू शकत नाही : संजय राऊत

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विविध प्रश्नावरून केंद्र सरकारवर टोला लगावला आहे. जम्मू काश्मिरमधील होत असलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. “आम्ही काश्मिरी पंडितांचे रक्षण करू असं म्हणत सत्तेवर आले आणि आता खुलेआम हत्या केल्या जात आहेत. ते पंडितांचे रक्षण करू शकत नाहीत.” असं म्हणत …

Read More »

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचे समन्स

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावले आहे. दोघांना ८ जूनला हजर राहण्यास सांगितले असल्याचे समजते. ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस दिली असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली …

Read More »

धक्कादायक! प्रसिध्द पार्श्वगायक ‘केके’चा मृत्यू अनैसर्गिक,

नवी दिल्ली : प्रसिध्द पार्श्वगायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. पण समोर आलेल्या माहितीनुसार, केके याचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या नाही, तर अनैसर्गिक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. केके यांच्या डोके, चेहरा आणि ओठावर जखमा आढळून आल्या असून, थोड्याच वेळात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे कळत …

Read More »

नाशिकमध्ये साधूंचा राडा

नाशिक : किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाच्या जन्मस्थळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा विषय लावून धरला. यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला आहे. दरम्यान, या वादावर चर्चा करण्यासाठी आज शास्त्रार्थ सभा बोलावण्यात आली. त्यासाठी देशभरातील धर्म प्रतिनिधी नाशकात दाखल झाले आहेत. मात्र, यावेळी आसन व्यवस्थेवरून वादाला तोंड …

Read More »

मुख्तार अब्बास नक्वी यांचे राज्यसभेचे तिकीट कापले

लोकसभेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील दोन उर्वरित जागांसाठीचे उमेदवार घोषित केले असून, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. केंद्रात मंत्रीपदावर राहण्यासाठी नक्वी यांना राज्यसभा किंवा लोकसभा सदस्य असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रामपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत …

Read More »

गॅस दराचा पुन्हा उडणार भडका?

नवी दिल्ली : जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर वाढविले जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात जागतिक बाजारात इंधनाचे भाव कडाडल्याने गॅस सिलिंडरची दरवाढ अटळ असल्याचे मानले जात आहे. नेमकी किती दरवाढ होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तेल कंपन्यांकडून …

Read More »

हार्दिक पटेल २ जून राेजी भाजप प्रवेश करणार

अहमदाबाद : काँग्रेसला सोडचिठ्‍ठी दिलेले गुजरातमधील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाला आहे. २ जून रोजी ते भाजपमध्‍ये प्रवेश करतील, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. काही दिवसांपूर्वीच हार्दिक पटेल यांनी गुजरात काँग्रेस प्रदेशाध्‍यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांच्‍याकडे सोपवला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला हा मोठा …

Read More »

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक

नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सत्येंद्र जैन यांची काही दिवसांपूर्वी ४ कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपचे नेते …

Read More »

बंगळुरूमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर शाईफेक; कार्यक्रमात गोंधळ

बेंगळुरू : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली. बेंगळुरूमधील पत्रकार परिषदे दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी शाईफेक करणार्‍याला ताब्यात घेतले आहे. या शाईफेकीमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. शाईफेक करणार्‍यांना टिकेत यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचे वृत्त आहे. गांधी भवनमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत आणि युद्धवीर …

Read More »