Wednesday , May 21 2025
Breaking News

मी मोदींचा छोटा शिपाई : हार्दिक पटेल यांचा भाजपमध्ये प्रवेश

Spread the love

अहमदाबाद : काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी आज (दि.२) भाजपमध्ये १५ हजार समर्थकांसह प्रवेश केला. मी पंतप्रधान मोदींचा छोटा शिपाई, अशी भावना हार्दिक पटेल यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली. मी आजपासून एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी काम करेन, असे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, पक्ष प्रवेशाआधी पटेल यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. मागील दोन वर्षापूर्वी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याने पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे गुजरातमध्ये भाजपची आणखी ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

दहशतवादी सैफुल्लाह खालीदची गोळ्या झाडून हत्या…

Spread the love  नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालीदची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *