Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

बसव जयंतीनिमित्त उद्या बेळगावात भव्य मिरवणूक

  बेळगाव : कर्नाटकाच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आणि महान मानवतावादी, विश्वगुरु बसवण्णांच्या जयंतीनिमित्त उद्या ४ मे रोजी सायंकाळी ४ वाजता बेळगावात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. बसव जयंती उत्सव समितीने सर्व नागरिकांना या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बसव जयंती उत्सव समितीने केले आहे. जगज्योती, मानवतावादी आणि सांस्कृतिक गुरू …

Read More »

हिंदु कार्यकर्ता सुहास शेट्टी हत्या प्रकरणावरून बेळगावात भाजप कार्यकर्त्यांचा संताप

  बेळगाव : हिंदू कार्यकर्ते सुहास शेट्टी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बेळगावात भाजप महापालिका विभागाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. शहरातील चन्नम्मा चौकात भाजपचे शेकडो कार्यकर्ते एकवटले होते. हातात बॅनर आणि पोस्टर्स घेऊन कार्यकर्त्यांनी काँग्रेस सरकार आणि सिध्दरामय्यांविरोधात घोषणा देत सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे पोस्टर्स फाडून यावेळी निषेध नोंदविण्यात आला. ही …

Read More »

नेताजी सोसायटीचे संचालक भरतकुमार मुरकुटे यांना शोकसभेत श्रद्धांजली

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक भरतकुमार मुरकुटे यांचे मंगळवार (ता. 29) रोजी आकस्मिक निधन झाले. त्यानिमित्त नेताजी सोसायटीच्या सभागृहामध्ये शुक्रवार (ता. 2) रोजी त्यांना सोसायटीचे संचालक, सल्लागार व कर्मचारी वर्गाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. कै.भरतकुमार मुरकुटे यांच्या फोटोचे पूजन सोसायटीचे चेअरमन डी. …

Read More »

राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू सान्वी पाटील संत मीरा शाळेत प्रथम

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेची राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू सान्वी संतोष पाटील हिने 2025 मधील दहावीच्या परीक्षेत 625 पैकी 619 गुण 99.4% टक्के घेत शहरात अव्वल क्रमांक पटकाविला आहे तर शाळेत प्रथम क्रमांक पटकावित उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. विद्या कैलास पिटुले हिने 625 पैकी 613 …

Read More »

बेळगावात अवतरली अवघी शिवसृष्टी!!

  बेळगाव : ‘जय शिवराय’चा अखंड गजर, ढोल-ताशांचा ठेका, टाळ-मृदुंगांच्या साथीने सादर होणारे भजन, एकाहून एक सरस देखाव्यांमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. प्रत्येक मंडळाने विलक्षण धडपड करून देखावे सादर केले. नरगुंदकर भावे चौक येथे पारंपरिक पद्धतीने पालखीचे पूजन पोलिस आयुक्त याडा मार्टिन व मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाचे खजिनदार प्रकाश …

Read More »

सेंट जोसेफची निधी कंग्राळकर जिल्ह्यात दुसरा

  बेळगाव : एसएससी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून बेळगाव येथील सेंट जोसेफ शाळेची विद्यार्थिनी निधी नंदकुमार कंग्राळकर यांनी 625 पैकी 624 गुण घेत बेळगाव जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. बैलहोंगल रूपा पाटील हिने 625 पैकी 625 गुण मिळवत राज्यात, आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. बेळगाव अनगोळ येथे …

Read More »

एसएसएलसी परीक्षेच्या निकालात बैलहोंगलची रूपा चनगौडा पाटील राज्यात अव्वल

  बेळगाव : कर्नाटक राज्याचा एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून बैलहोंगल तालुक्यातील देवलापूर गावातील सरकारी हायस्कूलच्या रूपा चनगौडा पाटील या विद्यार्थिनीने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलाहोंगल तालुक्यातील देवलापूर गावातील सरकारी हायस्कूलमधील विद्यार्थीनी रूपा पाटील हिने ६२५ गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

Read More »

प्यास फाउंडेशनच्या वतीने विकसित तलाव ग्रामपंचायतीकडे सोपवला

  बेळगाव : प्यास फाउंडेशनने विकसित केलेला तलाव ग्रामपंचायतीकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आला आहे. जलसंधारणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी जलस्त्रोत विकास करणाऱ्या प्यास फाउंडेशनने एक तलाव विकसित करून तो ग्रामपंचायतीकडे सुपूर्त केला. यावेळी …

Read More »

दहावीचा निकाल आज जाहीर होणार

  बेळगाव : दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले असून शुक्रवार दि. 2 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय परीक्षा- मूल्यमापन मंडळाने दिली आहे. 21 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत दहावीची परीक्षा झाली होती. 1 मे रोजी कामगार दिनानिमित्त सार्वत्रिक सुट्टी असल्याने 2 मे रोजी निकाल जाहीर …

Read More »

जायंट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे कामगार दिनाचे औचित्य साधून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार

  बेळगाव : जायंट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे १ मे कामगार दिनाचे निमित्त साधून वॉर्ड क्रमांक २८ मधील महानगर पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी उपमहापौर श्री. संजय शिंदे आणि लक्ष्मीरोड येथील ज्येष्ठ पांच काशिनाथ कडते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वच्छ्ता कर्मचारी वॉर्डासोबतच बेळगाव स्वच्छ ठेवून …

Read More »