Tuesday , November 24 2026
Breaking News

बेळगाव

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ योगतज्ज्ञ सुधीर धामणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी प्रमुख पाहुणे सुधीर धामणकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर प्रमुख पाहुणे सुधीर …

Read More »

एक्सलंट योगा क्लासेसतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

  बेळगाव : “योग महर्षी पतंजली यांनी सुरू केलेल्या आणि रामदेव बाबा व इतरांनी पुढे नेलेल्या योगासनाचा आता जगभर प्रसार झाला आहे. आमच्या पंतप्रधानानी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला आज बारा वर्षे पूर्ण होत आहेत” असे विचार योग गुरु शंकरराव कुलकर्णी यांनी बोलताना व्यक्त केले. घुमटमाळ मारुती मंदिर …

Read More »

मुक्तांगण विद्यालयात योग दिन साजरा

  बेळगाव : आदर्श गुण विकास प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण विद्यालय भाग्यनगर येथे बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कैवल्य योग आश्रमचे योग गुरु विश्वनाथ मनगुतकर हे उपस्थित होते. त्यांनी योगाचे महत्त्व प्रात्यक्षिकासह सांगितले. संस्थेचे चेअरमन ए. एल. गुरव व संचालक एस. एल. पाटील …

Read More »

जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के एल ई संस्थेच्या येथील जी. आय बागेवाडी महाविद्यालयत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. निपाणीतील के एल ई संस्थेच्या अंग संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्राचार्य एम. एम. हुरळी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. योग गुरु सचिन कोगले यांनी योग आणि आरोग्य …

Read More »

कोल्हापूर प्रशासनाच्या बंदी आदेश पत्रामुळे संताप; ७० वर्षांच्या सीमालढ्यातील निंदनीय घटना

  बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना कोल्हापुरात जाण्यापासून रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने बेळगाव जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केल्याचा आरोप समोर आल्यानंतर सीमाभागात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तब्बल सात दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या सीमालढ्याच्या इतिहासात असा प्रकार कधीही घडला नसल्याचा दावा …

Read More »

मराठी भाषा प्रेरणा मंच, बेळगावतर्फे कुमार पार्थ रामा इसराणी यांचा सत्कार

  बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ, येळ्ळूर संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी कुमार पार्थ रामा इसराणी (रा. बामणकोप) याने एस.एस.एल.सी. परीक्षेत 594 गुण (95.04 टक्के) मिळवून खानापूर तालुक्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मराठी भाषा प्रेरणा मंच, बेळगाव आयोजित “मराठी महोत्सव 2026 …

Read More »

मराठी भाषिकांचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; मराठी भाषिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

  बेळगाव : २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने नवा मार्ग स्वीकारत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने एकत्र जमून कन्नड सक्तीविरोधातील निवेदन सादर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मराठा मंदिर येथे रविवारी झालेल्या समितीच्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीच्या …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये पालकांची कार्यशाळा संपन्न

  बेळगाव : दिनांक 18 जून 2026 रोजी मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेत इयत्ता पहिलीच्या पालकांची कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील यांनी केले. तर पालकसभेत मराठी विषय दीप्ती कुलकर्णी, गणित विषय जयश्री पाटील, परिसर कमल हलगेकर, कन्नड सविता गुरव, इंग्रजी रोहिणी सावंत यांनी विषयवार मांडणी …

Read More »

विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीवरच मध्यान्ह आहाराचा निधी; गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

  बेळगाव : शालेय पोषण योजनांमधील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी आणि सरकारी निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने कडक पाऊल उचलले आहे. क्षीरभाग्य आणि मध्यान्ह आहार योजनेचा खर्च आता विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशी जोडण्यात आला असून, निरंतर ॲपमध्ये नोंदविलेल्या उपस्थितीच्या आधारेच दूध, भोजन, अंडी आणि फळांसाठीचा निधी मंजूर केला जाणार आहे. …

Read More »

अभिनेता प्रकाश राज यांच्याविरोधात अटक वॉरंट; न्यायालयाच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका

  बेंगळुरू : बहुभाषिक अभिनेते व दिग्दर्शक प्रकाश राज यांच्याविरोधात बेंगळुरू येथील ४८व्या एसीजेएम न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या नावावर विविध राज्यांमध्ये एकापेक्षा अधिक ओळखपत्रे असल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने यापूर्वी समन्स बजावले होते. मात्र, त्याला प्रतिसाद न दिल्याने न्यायालयाने ही कारवाई केल्याचे सांगितले जात …

Read More »