Tuesday , August 18 2026
Breaking News

मराठी भाषा प्रेरणा मंच, बेळगावतर्फे कुमार पार्थ रामा इसराणी यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ, येळ्ळूर संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी कुमार पार्थ रामा इसराणी (रा. बामणकोप) याने एस.एस.एल.सी. परीक्षेत 594 गुण (95.04 टक्के) मिळवून खानापूर तालुक्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मराठी भाषा प्रेरणा मंच, बेळगाव आयोजित “मराठी महोत्सव 2026 शैक्षणिक गौरव व मार्गदर्शन सोहळा” या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्याचा गौरव करण्यात आला.
कुंभारडा परिसरालगतच्या सीमावर्ती बामणकोप या दुर्गम व जंगलव्याप्त गावातील पार्थने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे यश संपादन केले आहे. इंटरनेट व दळणवळणाच्या सुविधा अत्यल्प असलेल्या भागात राहूनही त्याने जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या बळावर यशाला गवसणी घातली. विशेष म्हणजे इतिहास व इंग्रजी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून त्याने आपल्या गुणवत्तेची वेगळी छाप उमटवली असून पंचक्रोशीसह संपूर्ण खानापूर तालुक्यात त्याचे कौतुक होत आहे.

या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री पी. ए. पाटील, विज्ञान विषय शिक्षक श्री. व्ही. बी. पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्याच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक श्री. वाय. एन. मजुकर व सचिव श्री. प्रसाद मजुकर यांनी विशेष अभिनंदन करून त्याच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. पार्थच्या या यशामुळे श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण तसेच श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ, येळूर यांच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री वरद सिद्धिविनायक मंदिरात विविध कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : भक्तांच्या नवसाला पावणारा व सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा असे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *