Monday , August 17 2026
Breaking News

मुक्तांगण विद्यालयात योग दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : आदर्श गुण विकास प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण विद्यालय भाग्यनगर येथे बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कैवल्य योग आश्रमचे योग गुरु विश्वनाथ मनगुतकर हे उपस्थित होते. त्यांनी योगाचे महत्त्व प्रात्यक्षिकासह सांगितले. संस्थेचे चेअरमन ए. एल. गुरव व संचालक एस. एल. पाटील हेही उपस्थित होते.
नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना आणि स्वागत गीत गायल्यानंतर सुप्रिया टोणे यांनी स्वागत केले. प्राचार्य सविता जे. के. यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ओमकार नेतलकर या विद्यार्थ्याने अनेक आसने करून दाखवली. सुश्मिता टोणपे यांनी आभार प्रदर्शन केले. अवंतिका मंजलकर व खुशी माडकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन पी ई शिक्षक अर्जुन भेकणे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी कपिलेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी

Spread the love    बेळगाव : भगवान शिवशंकराच्या आराधनेत मन रमविणारा, भक्ती आणि अध्यात्माची अनुभूती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *