बेळगाव : “योग महर्षी पतंजली यांनी सुरू केलेल्या आणि रामदेव बाबा व इतरांनी पुढे नेलेल्या योगासनाचा आता जगभर प्रसार झाला आहे. आमच्या पंतप्रधानानी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला आज बारा वर्षे पूर्ण होत आहेत” असे विचार योग गुरु शंकरराव कुलकर्णी यांनी बोलताना व्यक्त केले.
घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी येथे गेल्या आठ वर्षापासून सुरू असलेल्या एक्सलन्ट योगा क्लासेस च्या वतीने रविवारी बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
25 हून अधिक साधकांनी 108 सूर्यनमस्कार घालून हा दिवस साजरा केला.
याप्रसंगी अनंत लाड यांनी प्रास्ताविक केले व योग दिनाबद्दलची माहिती सांगितली. शंकरराव कुलकर्णी यांनी योगासनाचा इतिहास सांगून आरोग्य संपन्न राहण्यासाठी नियमितपणे योग करा, असे सांगितले.
यावेळी इतरही साधकांची भाषणे झाली. योग गुरु कुलकर्णी सरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच योग गुरूंचा सन्मान आनंदराव शिरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण पटेल, शिवाजी मुचंडी, संदीप मोरे, छगन पटेल, दीपक आजरेकर, सुवर्णा कलबुर्गी, संध्या कुलकर्णी, विना कित्तूर, संगीता बागी, अनिता अंकलगी व इतरानी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta