Monday , August 17 2026
Breaking News

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ योगतज्ज्ञ सुधीर धामणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी प्रमुख पाहुणे सुधीर धामणकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर प्रमुख पाहुणे सुधीर धामणकर यांनी नॅचरोपॅथी अँड योगा सायन्स कॉलेज, घटप्रभा येथील योग प्रशिक्षक प्रवीणकुमार डी. आणि बुद्देश आर. यांचा योग क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार केला.
यावेळी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासाचे आरोग्यदायी फायदे तसेच निरोगी जीवनशैलीसाठी योगाचे योगदान याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. योग प्रशिक्षक बुद्देश आणि प्रवीण यांनी विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीजीत मधू पाटील यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व विश्वभारत सेवा समितीचे दुसरे बालकवी संमेलन 18 ऑगस्टला

Spread the love  बेळगांव : तारांगण व विश्वभारत सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने दुसरे बालकवी संमेलन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *