Monday , August 17 2026
Breaking News

विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा 30 जुन पासून

Spread the love

 

बेळगाव : अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 30 जूनपासून प्रारंभ होणार आहे, नुकत्याच संत मीरा शाळेत घेण्यात आलेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर विद्याभारती राज्यसचिव सुजाता दप्तरदार संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आव्हान केले. यानंतर क्रीडा शिक्षकांनी विचार विनिमय बैठकीत करून पुढील प्रमाणे क्रीडा स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला मंगळवार तारीख 30 जून रोजी कबड्डी, बुद्धिबळ, कराटे, स्पर्धा संत मीरा अनगोळ शाळेच्या मैदानावर, तर गुरुवार ता. 2 जुलै रोजी फुटबॉल नेताजी सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर, सोमवार ता. 6 जुलै रोजी हॉलीबॉल शांतिनिकेतन स्कूल खानापूर, मंगळवार ता. 7 रोजी खो खो व मलखांब संत मीरा गणेशपुर शाळा तसेच मंगळवार ता. 14 जुलै रोजी अथलेटिक स्पर्धा जिल्हा क्रीडांगण नेहरूनगर बेळगाव येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत विद्याभारती संलग्नित गजाननराव भातकांडे हानिवेल स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, संत मीरा गणेशपुर, देवेंद्र जिंगगौडा स्कूल शिंदोळी, ज्ञान प्रबोधन स्कूल रामदुर्ग, संत मीरा स्कूल अनगोळ या शाळेच्या क्रीडाशिक्षकांनी बैठकीत उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *