Monday , August 17 2026
Breaking News

जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के एल ई संस्थेच्या येथील जी. आय बागेवाडी महाविद्यालयत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. निपाणीतील के एल ई संस्थेच्या अंग संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्राचार्य एम. एम. हुरळी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. योग गुरु सचिन कोगले यांनी योग आणि आरोग्य बद्दल मार्गदर्शन करत सर्वांना योगासन करविले. येथील के एल ई संस्थेचे स्कूल आणि महाविद्यालयातील सुमारे 400 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.
योग गुरु सचिन कोगले यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिकरित्या निरोगी राहण्यासाठी रोज योगा व व्यायाम नियमित करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, नौकासन, मर्कटासन भुजंगासन, वृक्षासन, सिंहासन अशी वेगवेगळी आसणे केली. यावेळी सर्व महाविद्यालयातील प्राचार्य मुख्याध्यापक, प्राध्यापक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.बसवराज यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

Spread the love  पथसंचलन, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बेळगाव : देशभक्तीचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *