Tuesday , August 18 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये पालकांची कार्यशाळा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : दिनांक 18 जून 2026 रोजी मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेत इयत्ता पहिलीच्या पालकांची कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील यांनी केले. तर पालकसभेत मराठी विषय दीप्ती कुलकर्णी, गणित विषय जयश्री पाटील, परिसर कमल हलगेकर, कन्नड सविता गुरव, इंग्रजी रोहिणी सावंत यांनी विषयवार मांडणी केली.

शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले यांनी शाळेचे नियम, मेंदूचा विकास याबद्दल पालकांना माहिती दिली. पहिलीच्या वर्गातील सर्व विषयांच्या कृतीची वर्गमांडणी करण्यात आली. वर्ग मांडणी निरीक्षणातून कृती घेण्यात आली. चित्रकला, हस्तकला, संगीत, खेळ या सर्व विषयांतून कार्यशाळा भरवण्यात आली. मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, माध्यमिक मुख्याध्यापक नारायण उडकेकर, संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, पहिली वर्गाचे सर्व विषय शिक्षक, तेजश्री हंडे, यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कमल हलगेकर तर आभार प्रदर्शन जयश्री पाटील यांनी मानले.

 

About Belgaum Varta

Check Also

समाज हिताच्या प्रश्नासाठी समाज सारथी संघ राहणार अग्रेसर

Spread the love  मृत्यू नोंदणीतील अडथळे, शिवाजी रोडवरील विद्युत तारा दुरुस्ती, येळ्ळूर रस्त्यावरील कचऱ्याच्या समस्येबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *