Tuesday , August 18 2026
Breaking News

श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यात मोहरम सणाला प्रारंभ

Spread the love

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार यांच्या राजवाड्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मोहरम सणाला रविवारी (ता.२१) प्रारंभ करण्यात आला. निपाणी संस्थांनचे श्रीमंत दादाराजे निपाणकर यांनी ऊद घालून पिरपंजांची स्थापना केली. यापुढील काळातही रोज पाच दिवस करण्यात येणार आहे. अंबादास चितारे यांच्या हस्ते ताबूत सजवण्यात आले चार पिढ्या पासून सातत्याने ते ताबूत सजवण्याचे काम करत आहेत. गेश चितारे ही चौथी पिढी हिरारीने पुढे येऊन निपाणकर राजघराण्याला ताबूत सजवून दिला आहे. शुक्रवारी (ता.२६) ताबूत विसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे. शहरांमध्ये विविध ठिकाणी हा सण साजरा होत आहे
विसर्जन दिवशी सकाळी निपाणकर राजघराण्याचे मानकरी भुई या पीरपंजे व ताबूत गावातील प्रमुख प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवाजी भोई, गजानन भोई, शिवम भोई, पृथ्वी भोई, पांडू भोई यांची देखील तिसरी पिढ हा सण करत आहेत. सायंकाळी निपाणकर राजवाड्यामध्ये सर्व गावातील पीर पंजे ताबूत घेऊन फात्या पडल्यानंतर विसर्जन करून मोहरम सणाची सांगता होणार आहे. पीर पंजाच्या स्थापने प्रसंगी समीर सनदी, इक्बाल सनदी, भूषण खैरे, अमोल भोसले, सुजित गायकवाड, सागर कमते, संजीव कांबळे, पप्पू कांबळे, मच्छिंद्र कमते, इक्बाल तोरगल, शनीलाल कोल्हापुरे, अल्ताफ बाडीवाले यांच्यासह मानकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली

Spread the love  दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *