Tuesday , August 18 2026
Breaking News

निपाणी मराठा मंडळ शिक्षण संस्थेत जागतिक योगदिना निमित्त विविध उपक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व मराठा मंडळ हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात जागतिक योग दिन पार पडला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून योग प्रशिक्षक प्रवीण पाटील उपस्थित होते.
पाटील यांनी, विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. तसेच विविध योगासने व प्राणायामाचे प्रकार सादर केले. वयाच्या ७१ व्या वर्षीही प्रवीण पाटील यांनी योगाच्या माध्यमातून शरीर कसे सुदृढ, लवचिक व निरोगी ठेवता येते, उदाहरण उपस्थितांसमोर ठेवले. कार्यक्रमास मुख्याध्यापक डी. डी. हळवणकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. आर. मोहिते, प्राथमिक विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, व्ही. व्ही. पत्की, एस. डी. साखळकर, जे. आर. खपले, ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, अर्चना पाटील, पूजा पाटील, प्रियांका पाटील, तावदारे, लेखनिक मुकुंद कोरे, प्राथमिक विभागाचे एस. एस. पाटील, जी. एस. पाटील, पी. एस. घाटगे, एस. बी. कांबळे, व्ही. एस. बुरुड, जे. पी. ढंगे, एस. एस. मोरे, एम. ए. चव्हाण, अश्लेषा केसरकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली

Spread the love  दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *