Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बिरदेव ढोणेचा युवा समिती सीमाभागच्यावतीने सत्कार

  बेळगाव : कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्याच्या यमगे गावचा युवक बिरदेव सिद्दाप्पा ढोणे याने भारतीय लोकसेवा आयोगाच्या 2025 च्या परीक्षेत देशात 551 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला. मेंढपाळीचा व्यवसाय म्हणजेच बेळगाव सीमाभागातील विविध गावात भटकंती करत मेंढराना चारवत एका प्रतिकूल परिस्थितीतून भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा बिरदेवने उत्तीर्ण केली. या सत्कार प्रसंगी …

Read More »

डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सृजन पाटील याला सुवर्ण पदक

    बेळगाव : बृहन्मुबई विज्ञान शिक्षक मंडळाच्या वतीने‌ डाॅ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धा – 2024-25 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेच्या सृजन पाटील यांने सुवर्ण पदक पटकाविले आहे.. ही एक आगळीवेगळी स्पर्धा असून वर्षभर मुलांना वेगवेगळी प्रात्यक्षिक करून आपला अहवाल मुलाखतीच्या माध्यमातून मांडावा लागतो. या स्पर्धेसाठी …

Read More »

पिरनवाडीत ड्रेनेज पाइपवरून वाद : तिघांची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी येथे ड्रेनेज पाइपच्या वादातून मारहाण होऊन गंभीर जखमी झाल्याच्या प्रकरणात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षांमध्ये विरोधाभास आढळल्याने दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे. पिरनवाडी येथील मारुती पुंडलीक सुतार (वय ३६), आकाश परशुराम सुरतेकर (वय २६), व …

Read More »

काश्मीरमध्ये हिंदू पर्यटकांच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीराम सेनेकडून तीव्र निषेध

  बेळगाव : काश्मीरमधील पहेलगाममध्ये झालेल्या हिंदू पर्यटकांच्या निर्घृण हत्येविरोधात बेळगावमध्ये श्रीराम सेनेच्यावतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत केंद्र सरकारकडे कठोर कारवाई करावी याची मागणी केली. काश्मीरमधील पहलगाम भागात हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज श्रीराम सेनेने तीव्र निषेध आंदोलन केले. …

Read More »

पहलगाममधील हिंदूंच्या हत्येच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनचे आंदोलन

  बेळगाव : पहलगाममधील हिंदूंच्या हत्येच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनने आंदोलन केले आणि केंद्र सरकारकडून दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली. यावेळी केंद्र सरकारला निवेदनही सादर करण्यात आले. आज बेळगाव बार असोसिएशनने पहलगाममधील हिंदूंच्या हत्येच्या निषेधार्थ एक आंदोलन केले आणि केंद्र सरकारकडून दहशतवाद्यांविरोधात कडक कायद्यांची मागणी केली. बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. …

Read More »

शेतात कामासाठी गेलेल्या मुलीचा वीज कोसळून मृत्यू

  बेळगाव : खनगाव येथे वीज पडून १५ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली असून अत्सा जमादार असे या मुलीचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अत्सा जमादार ही शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या आईसोबत शेतात गेली होती. अचानक विजांच्या गडगडाटासह पावसाला …

Read More »

जायंट्स मेनच्या वतीने जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांना श्रद्धांजली व दहशतवाद्यांचा तीव्र निषेध

  बेळगाव : जम्मू काश्मीर येथील पहलगाम मधील बेसनूर खोऱ्यात झालेल्या भीषण दहशतवादी संघटनेच्या गोळीबारात २८ भारतीय पर्यटकांची गोळ्या घालून भीषण हत्या करण्यात आली याचे तीव्र पडसाद संपूर्ण भारत देशात प्रत्येक भारतीयांच्या मनात उमठलेले असून जायंट्स मेन या संघटन्येच्या वतीने बुधवारी सायंकाळी सात वाजता हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारकाजवळ संघटनेचे …

Read More »

सार्वजनिक वाचनालयातर्फे पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन : एक आठवडाभर वाचकांसाठी राहणार खुले

  बेळगाव : 23 एप्रिल या जागतिक पुस्तक दिनानिमित्त सार्वजनिक वाचनालय, गणपत गल्ली बेळगाव येथे भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक ऍड. आय. जी. मुचंडी आणि अभय याळगी यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य मराठी विकास संस्था मुंबई या संस्थेतर्फे महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास …

Read More »

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीराम सेना हिंदुस्थानचे आंदोलन

  बेळगाव : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून 28 जणांचा बळी घेतला. या दहशतवादी कृतीच्या निषेधार्थ श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने बुधवारी आंदोलन छेडण्यात आले. तसेच प्रशासनाला निवेदन सादर करून दहशतवादाचा बीमोड करण्याची मागणी करण्यात आली . श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन सादर …

Read More »

मेणसे फिटनेस क्लब आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत साहील पाटील अव्वल…

  बेळगाव : येळ्ळूर येथील समिती स्कूलच्या मैदानावर मेणसे फिटनेस क्लब आयोजित बेळगाव जिल्हा शरीर संघटनेच्या मान्यतेने मेणसे फिटनेस टॉपटेन शरीरसौष्ठव स्पर्धेत साहील पाटील अव्वल ठरला. या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे : साहिल पाटील, कल्पेश कुंडेकर, आकाश जोगानी, चेतन पेडणेकर, हणमंत पाटील, किशोर बिजगर्णीकर, ओमकार येळवी, प्रथमेश उंदरे, अनिकेत पाटील, …

Read More »