Sunday , July 26 2026
Breaking News

गोवावेस जवळ ट्रकच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : शाळेतून मुलांना घरी घेऊन जात असताना गोवावेस येथील सिग्नलजवळ भरदुपारी झालेल्या एका भीषण अपघातात पादचारी महिलेचा मृत्यू झाला असून शिबा वासिम इनामदार (वय ३२, रा. बाबले गल्ली, अनगोळ) असे मृत महिलेचे नाव आहे. आपल्या दोन मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघात होताच महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोवावेस सर्कलजवळ दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेळगाव शहरात सिग्नल वर भर शहरात वाहनावरील गाड्यांच्या वेगावर नियंत्रण हवे अशी मागणी वाढू लागली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *