Tuesday , November 24 2026
Breaking News

बेळगाव

डोळे उघडताच स्वप्न संपते, डोळे मिटताच संसार संपतो : आचार्य राजरक्षितसूरिजी

  बेळगाव : “स्वप्न कितीही सुंदर आणि आनंददायी असले तरी डोळे उघडताच ते संपून जाते. त्याचप्रमाणे संसार कितीही सुख-सुविधा, संपत्ती आणि वैभवाने भरलेला असला तरी डोळे मिटताच सर्व काही संपून जाते,’ असे विचार गुजरातहून बेळगावला सत्संगासाठी आलेल्या आचार्य राजरक्षित सुरजी यांनी शनिवारी बोलताना व्यक्त केले. श्री संभावनाथ जिनालय सदाशिवनगर येथे …

Read More »

आंतर क्लब स्पर्धेत बेळगाव स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकावले

  बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित धारवाड विभागीय 19 वर्षांखालील मुलांच्या आंतर क्लब क्रिकेट स्पर्धा 2026-27 मध्ये बेळगाव स्पोर्ट्स क्लब (अ) संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात हुबळी क्रिकेट अकॅडमी (अ) संघाचा 5 गडी राखून पराभव करत बेळगावच्या युवा क्रिकेटपटूंनी आपली ताकद सिद्ध केली. बेळगाव, धारवाड, …

Read More »

अपार्टमेंटमध्ये देहविक्री व्यवसायावर टिळकवाडी पोलिसांचा छापा; महिला अटकेत, तरुणीची सुटका

  बेळगाव : शहरातील टिळकवाडी परिसरातील नेहरू रोडवरील एका बहुमजली अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर टिळकवाडी पोलिसांनी छापा टाकून एका तरुणीची सुटका केली असून, हा व्यवसाय चालवणाऱ्या महिलेस अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आयेशा शब्बीर शेख ऊर्फ रेश्मा अंकलेवाले (वय ३१) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी …

Read More »

पहिल्या रेल्वे गेटजवळ रेल्वेखाली सापडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

  बेळगाव : शहरातील पहिल्या रेल्वे गेटजवळ शनिवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत रेल्वेखाली सापडून एका अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान पहिल्या रेल्वे गेट परिसर रुळावर एका व्यक्तीचा रेल्वेखाली …

Read More »

रोहित पवारांच्या आमरण उपोषणाला बेळगावातून जाहीर पाठिंबा; शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षाला बळ

  बेळगाव : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला बेळगावातूनही जोरदार पाठिंबा मिळाला आहे. श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आणि कृतिशील मराठा समाजाचे समन्वयक अमित देसाई यांनी पंढरपूर येथे जाऊन रोहित पवार यांची भेट घेत आंदोलनाला जाहीर …

Read More »

स्वीटी नर्सरीतर्फे अक्षराभ्यास संस्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न

  बेळगाव : कौटुंबिक वातावरणानंतर मुलांचे पहिले पाऊल ज्या ठिकाणी पडते, ते म्हणजे नर्सरी शाळा. त्यामुळे बालकांच्या जडणघडणीत आणि संस्कारक्षम शिक्षणात नर्सरी शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. याच उद्देशाने भांदूर गल्ली येथील स्वीटी नर्सरीतर्फे श्री साई दत्त मंदिर, भांदूर गल्ली येथे अक्षराभ्यास संस्कार कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला …

Read More »

राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे बिजगर्णी हायस्कूलला वाॅटर फिल्टर भेट

  कावळेवाडी… येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे बिजगर्णी हायस्कूलला वाॅटर फिल्टर भेट देऊन माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छ पाण्याची सोय करून दिली. हायस्कूलमध्ये शुद्ध पाणी मिळत असल्याने समाधान व्यक्त केले. उपाध्यक्ष एस एम जाधव यांच्या हस्ते पूजन करून उद्घाटन करण्यात आले. निवृत्त मुख्याध्यापक अशोक येटले (वेंगुर्ले) यांनी श्रीफळ …

Read More »

बापट गल्लीतील फुटलेल्या ड्रेनेज झाकणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

  बेळगाव : शहरातील नागरी सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना रोजच विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच बापट गल्ली येथील कॉर्नरवर अनेक दिवसांपासून ड्रेनेजचे झाकण फुटलेल्या अवस्थेत असून वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू असल्याने रस्ते, गटारे …

Read More »

विद्यार्थ्यांना मोफत बस पास; सीमाभागातील विद्यार्थ्यांनाही लाभ

  बेळगाव : राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास सुलभ व्हावा यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यात येणार आहेत. परिवहन खात्याने शुक्रवारी यासंदर्भातील अधिकृत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. या योजनेअंतर्गत राज्यातील शाळा, महाविद्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व …

Read More »

सीमा ठरावावरून नव्या चर्चेला तोंड; “बेळगाव कर्नाटकातच, मग स्वतंत्र ठरावाची गरज काय?” : खासदार जगदीश शेट्टर

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटकाच्या बाजूने सीमा ठराव मंजूर करण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या वादात आता बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग असताना महापालिकेत स्वतंत्र ठराव मांडण्याची गरजच काय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या पत्रकार परिषदेत बोलताना शेट्टर म्हणाले …

Read More »