Sunday , June 14 2026
Breaking News

अपार्टमेंटमध्ये देहविक्री व्यवसायावर टिळकवाडी पोलिसांचा छापा; महिला अटकेत, तरुणीची सुटका

Spread the love

 

बेळगाव : शहरातील टिळकवाडी परिसरातील नेहरू रोडवरील एका बहुमजली अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर टिळकवाडी पोलिसांनी छापा टाकून एका तरुणीची सुटका केली असून, हा व्यवसाय चालवणाऱ्या महिलेस अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आयेशा शब्बीर शेख ऊर्फ रेश्मा अंकलेवाले (वय ३१) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने अपार्टमेंटमधील घर भाड्याने घेऊन तेथे तेलंगणातील एका तरुणीला ठेवले होते. ग्राहकांना थेट घरात बोलावून अनैतिक व्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकाराची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष पथकाने कारवाई केली. छाप्यात संबंधित तरुणीची सुटका करण्यात आली असून आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.

प्राथमिक चौकशीत ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांपैकी अत्यल्प रक्कम तरुणीला देऊन उर्वरित पैसे आरोपी स्वतःकडे ठेवत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PIT Act) १९५६ अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे बिजगर्णी हायस्कूलला वाॅटर फिल्टर भेट

Spread the love  कावळेवाडी… येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे बिजगर्णी हायस्कूलला वाॅटर फिल्टर भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *