Wednesday , July 29 2026
Breaking News

पहिल्या रेल्वे गेटजवळ रेल्वेखाली सापडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : शहरातील पहिल्या रेल्वे गेटजवळ शनिवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत रेल्वेखाली सापडून एका अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान पहिल्या रेल्वे गेट परिसर रुळावर एका व्यक्तीचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तसेच टिळकवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृत व्यक्ती कोण आहे आणि ती कुठली रहिवासी आहे, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. हा प्रकार आत्महत्येचा आहे की धावत्या रेल्वेतून पडल्याने झालेला अपघात आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नसून सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी नोंद करून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी परिसरातील पोलीस ठाण्यांशी संपर्क साधण्यात येत असून नागरिकांनी संबंधित व्यक्तीबाबत माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

घराच्या उंबरठ्यावरच सोनसाखळीवर डल्ला; प्रसंगावधानामुळे अर्धे गंठण वाचले

Spread the love  बेळगाव : शहरात साखळीचोरीच्या घटना पुन्हा डोके वर काढत असून, गावावरून घरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *