Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

बेळगावच्या निर्मात्यांनी साकारलेली मनोरंजनाची अफलातून ट्रीट “ऑल इज वेल” 27 जूनला चित्रपटगृहात

  बेळगाव : मैत्री … ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पड‌द्यावर येत्या २७ जूनला ‘ऑल इज वेल’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सहकुटुंब अनुभवायला …

Read More »

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी निलंबित पोलिसांच्या निर्णयाविरोधात अभाविपचे आंदोलन

  बेळगाव : बेंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांना जबाबदार धरून त्यांच्या निलंबनाच्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत, तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले. आज बेळगावातील आर.पी.डी. सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थिनी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी अभाविपचे राज्य कार्यकारिणी सदस्य मंजुनाथ …

Read More »

शेतातील विहिरीत बुडून पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू; अथणी येथील घटना

  अथणी : बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील चिक्कुड गावात ५ वर्षाच्या मुलाचा शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोज गिद्दप्पा वड्डर (वय ५) असे त्या मृत मुलाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, मनोज घराबाहेर खेळत असताना नजीकच असलेल्या विहिरीजवळ गेला अन् पाय घसरल्याने तोल जाऊन …

Read More »

जायंट्स आय फौंडेशन आणि जायंट्स मेन यांच्यावतीने नेत्रदान जनजागृती फलक!

  बेळगाव : जायंट्स आय फौंडेशन आणि जायंट्स मेन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक नेत्रदान दिनाचे औचित्य साधून सदाशिवनगर स्मशानभूमीत नेत्रदान जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांचे स्वागत सचिव विजय बनसुर यांनी केले तर प्रास्ताविक माजी अध्यक्ष शिवराज पाटील यांनी जायंट्स आय फौंडेशनच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. प्रमुख …

Read More »

हरहुन्नरी शिक्षिका शीतल बडमंजी यांना वाहिली श्रद्धांजली!

  बेळगाव : हरहुन्नरी शिक्षिका शीतल बडमंजी यांची शोकसभा दिनांक ९ जून रोजी मराठी विद्यानिकेतन, गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, माजी विद्यार्थी संघटना मराठी विद्यानिकेतन व मराठा महिला मंडळ यांच्यातर्फे मराठी विद्यानिकेतन येथे शिक्षिका शीतल बडमंजी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या, हरहुन्नरी, कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या शीतल बडमंजी यांचे …

Read More »

मंगाई देवीच्या यात्रेनिमित्त 20 जून रोजी गाऱ्हाने घालण्याचा कार्यक्रम…

  बेळगाव : जुलै महिन्यात पार पडणाऱ्या वडगाव येथील ग्राम देवता मंगाई देवीच्या यात्रेसाठी शुक्रवारी (ता. २०) पारंपारिक पद्धतीने गाऱ्हाने घालण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. शहरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या मंगाई देवीची यात्रा २२ जुलै रोजी पार पडणार असून दरवर्षी यात्रेच्या एक महिना अगोदर गाऱ्हाणे घातले जातात. त्यानुसार …

Read More »

नगरसेवक अपत्रातता प्रकरणाची सुनावणी उद्या

  बेळगाव : विद्यमान महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव अपात्रता प्रकरणी बुधवार दिनांक 11 रोजी सुनावणी होणार आहे असे मागील सुनावणी दरम्यान नगर विकास खात्याच्या सचिव दीपा चोळण त्यांनी सांगितले होते. त्या प्रकरणाची मागील सुनावणी पाच जून रोजी झाली होती त्यावेळी पुढील सुनावणी 10 जून रोजी होईल व …

Read More »

निवृत शिक्षक के एन पाटील यांच्याकडून भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयाला संगणक भेट

  येळ्ळूर : सुळगे- येळ्ळूर येथील विज्ञान विषयाचे निवृत्त शिक्षक के एन पाटील यांनी सुळगे (येळ्ळूर) येथील भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयाला संगणक देणगी दाखल दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी ए खोरागडे होते. मुलींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक डी ए खोरागडे यांनी निवृत्त विज्ञान शिक्षक के एन …

Read More »

मराठा एकता एक संघटनतर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : मराठा एकता एक संघटनतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही तालुकास्तरीय बोर्ड परीक्षेत उत्तम गुण संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत संघटनेचे अमोल जाधव यांनी केले तर परिचय, शिवाजी कामनाचे,मोहन जाधव यांनी केले. …

Read More »

कपिलेश्वर मंदिरात सावित्री माता पूजनाने वटपौर्णिमा साजरी

  बेळगाव : बेळगावातील श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान येथे आज मंगळवारी वटपौर्णिमा भक्तीभावाने साजरी करण्यात येत असून देवस्थान ट्रस्टच्यावतीने विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह आज सकाळी वयोवृद्ध दाम्पत्याचा सत्कार सोहळा देखील पार पडला. बेळगाव शहरातील सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान येथे सावित्रीच्या मूर्तीचे पूजन मंदिराच्या परिसरात करण्यात आले. …

Read More »