Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव

गणेश मंडळाचा “मराठी” फलक महापालिका प्रशासनाने हटवला!

  बेळगाव : मराठी भाषेची कावीळ झालेल्या कन्नड संघटनांसह महानगरपालिका प्रशासनाची वक्रदृष्टी आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मराठी फलकांवर पडली आहे. पाटील गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शहीद भगतसिंग चौकात उभारलेला मराठी फलक पालिका प्रशासनाने शुक्रवारी (दि. 25) रोजी हटविला. दरम्यान, कन्नड भाषेची सक्ती करणारा आदेश केवळ नामफलकापुरता मर्यादित असतानाही महापालिकेने शहरात …

Read More »

भारत विकास परिषदेची १० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा रविवार दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वा. संत मीरा शाळेच्या माधवाश्रम सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. हिंदी देशभक्तीगीत आणि लोकगीत (मराठी/कन्नड) अशा दोन विभागात स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धेमध्ये अधिकाधिक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन भाविपने केले आहे. हिंदी विभागातील …

Read More »

देहदान केलेल्या कलाताईंचा आदर्श प्रेरणादायी : प्रा. आनंद मेणसे

  बेळगाव : “चळवळीत आपल्या पतीबरोबर काम करीत असतानाच या जगाचा निरोप घेताना आपल्या शरीराचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून देहदान करणाऱ्या कलाताईंनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांचे हे कार्य पुढे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल” असे विचार प्रा. आनंद मेणसे यांनी बोलताना व्यक्त केले. गेल्या मंगळवारी सौ. …

Read More »

बेळगाव महापालिकेत मराठी परिपत्रकावरून गोंधळ; संग्राम कुपेकर यांचा ठाम सवाल

  बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या सभेत आज मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद झाला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी महापालिकेची परिपत्रके मराठीत द्यावीत, अशी जोरदार मागणी केली. या मागणीवरून सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी महाराष्ट्र भाजपचे नेते संग्राम कुपेकर यांनी ठाम भूमिका घेत, स्पष्ट शब्दांत विचारले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व …

Read More »

संत मीरा बेळगांव, आरव्हीके बंगळूर, विवेकानंद कॉलेज मंगळूर यांना विजेतेपद

  बेळगाव : गणेशपुर रोड येथील गुडशेफर्ड शाळेच्या आवारातील बेळगाव टर्फ मैदानावर विद्याभारती बेळगाव जिल्हा व संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय आंतरशालेय मुला मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा बेळगांव, आरव्हीके, बंगळूर , विवेकानंद पदवीपूर्व कॉलेज मंगळूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. 14 वर्षाखालील मुलांच्या …

Read More »

कन्नडसक्ती थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू; मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत यासह सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या कन्नडसक्तीविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. भाषिक अल्पसंख्याकांना कायद्याने दिलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच त्यांना मिळणाऱ्या सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती देताना …

Read More »

शहापूर विभाग सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक 27 जुलै रोजी

  बेळगाव : मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ, शहापूर विभागातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता बलभीम व्यायाम मंडळ सांस्कृतिक भवन, नवी गल्ली, शहापूर या ठिकाणी बोलाविण्यात आली आहे. तरी शहापूर विभागील शहापूर, होसूर, खासबाग, भारत नगर, वडगांव, जुने बेळगांव, आदी …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक २७ रोजी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक रविवार दिनांक २७ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी या बैठकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र …

Read More »

कुसमळी पुलाजवळ ट्रक अडकला; वाहतुकीवर परिणाम!

  बेळगाव : बेळगाव – जांबोटी – गोवा महामार्गावरील कुसमळी पुलाजवळ रस्त्यावरील चिखलात एक ट्रक अडकला, ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. मिळालेल्या माहितीनुसार कुसमळी पुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे आणि बरेच काम प्रलंबित आहे. या मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. तथापि, गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या …

Read More »

मराठी भाषेच्या रक्षणासाठी समिती नगरसेवकांनी दंड थोपटले!

  बेळगाव : मराठी भाषेच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेविकांनी महानगरपालिकेत आवाज उठवला. “आम्हाला प्रशासनाचे उपकार नको, आम्हाला आमचे भाषिक हक्क हवेत” अशी मागणी करत नगरसेवक रवी साळुंखे नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी सभात्याग केला तर सत्ताधारी व विरोधी गटातील काही नगरसेवकांनी मराठीतून परिपत्रके देण्यास विरोध …

Read More »