Monday , September 21 2026
Breaking News

युवा समिती सीमाभागच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करताना शुभम शेळके यांनी बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला, प्रत्येकाला त्यांच्या भाषेत बोलण्याचा अधिकार मिळवून दिला, हीच प्रेरणा घेऊन आपण संविधान मार्गाने आपला देश व समाज टिकवला पाहिजे असे सांगितले.

यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार व‌ नगरसेवक शिवाजी मंडोळकर, प्रमुख सल्लागार अशोक घगवे, रमेश माळवी, रणजित हावळाणाचे, सुरज जाधव, ऍड. वैभव कुट्रे, रामचंद्र कुद्रेमणीकर, सह आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *