Monday , September 21 2026
Breaking News

ऑनर किलिंगच्या घटनेने बेळगाव जिल्हा हादरला

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना घडली असून, त्यामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याच्या कारणावरून एका तरुणीची तिच्याच कुटुंबीयांनी हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळला. ही भीषण घटना उशिरा उघडकीस आली आहे.

दुर्दैवी पीडितेची ओळख रायबाग तालुक्यातील हनबरट्टी गावातील २४ वर्षीय सत्यव्वा संतोष हलवार अशी पटली आहे. सत्यव्वाचे लग्न झाले होते, परंतु ती कृष्णा पाटीलच्या प्रेमात होती आणि तिने पतीला सोडून कृष्णा सोबत घर सोडले होते. आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा गमावल्याने संतप्त झालेले तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते.

१३ मार्च रोजी सत्यव्वा तिच्या कुटुंबीयांना सापडली आणि तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. नंतर, पोलीस किंवा इतर कोणालाही कोणताही सुगावा लागू नये म्हणून त्यांनी तिचा मृतदेह जाळून टाकला. या संदर्भात यमकनमर्डी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. जेव्हा पोलिसांनी तपास हाती घेतला, तेव्हा हे अमानुष कृत्य उघडकीस आले.

पोलिसांनी या प्रकरणी तरुणीचे काका प्रकाश हलवार, भाऊ शानूर हलवार आणि मेहुणा कल्लप्पा मोरबद या तिघांना अटक केली आहे. प्राथमिक तपासानुसार, ही हत्या महाराष्ट्रातील मिरज पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असून, पोलीस सध्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची पुढील चौकशी करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *