Thursday , April 16 2026
Breaking News

संजीवनी फाउंडेशनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी

Spread the love

 

बेळगाव : संजीवनी फाउंडेशनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. समाजात समानता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन मदन बामणे, सल्लागार सदस्य संजय पाटील तसेच संस्थेचे कर्मचारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सल्लागार सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच श्रीफळ वाढवून पारंपरिक पद्धतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थित सर्वांनी बाबासाहेबांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
यानंतर एच. आर. कावेरी लमानी यांनी उपस्थित मान्यवरांचे मनापासून स्वागत केले तर समुपदेशक सरिता सिद्दी यांनी प्रास्ताविक केले.

चेअरमन मदन बामणे यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, संघर्षमय प्रवास, शिक्षणाबद्दलची त्यांची भूमिका तसेच भारतीय संविधान निर्मितीतले त्यांचे योगदान यावर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी बाबासाहेबांचे विचार आजच्या काळातही किती महत्त्वाचे आहेत हे अधोरेखित करत उपस्थितांना त्यांचे आदर्श आचरणात आणण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चना शिरहट्टी यांनी अतिशय सुंदर व नेटक्या पद्धतीने केले, तर आभार प्रदर्शन सावित्री माळी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास सुनिल चन्नदासर, अक्षता अक्कोळे, सचिन राठोड, अंकिता राजोरे, शशिकांत कांबळे,राधिका कलादगी, भूमी कणबरकर, बसम्मा बेनकट्टी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

सर्वांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन केले.
या जयंती सोहळ्याच्या माध्यमातून संजीवनी फाउंडेशनने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करत समाजात बंधुता, समानता आणि शिक्षणाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. असा प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे व सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले.

About Belgaum Varta

Check Also

श्रीमद जगदगुरु शंकराचार्य जयंती उत्सव १८ ते २१ एप्रिल

Spread the love  बेळगाव : श्रीमद जगदगुरु शंकराचार्य जयंती उत्सवाचे शनिवार दि. १८ ते मंगळवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *