Monday , September 21 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Spread the love

 

बेळगाव : दिनांक १४ एप्रिल रोजी मराठी विद्यानिकेतनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील शिक्षिका शाहीन शेख उपस्थित होत्या. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दलितांचा कैवारी, माणसांच्या सहवासात राहण्यापेक्षा पुस्तकांच्या सहवासात राहणे महत्त्वाचे, दीन -दलितांच्या उध्दारासाठी जीवाचे रान करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन करणारे भारताचे पहिले कायदेमंत्री,भारतीय संविधानाचे शिल्पकार, त्यांचे शिक्षण, त्यांचे कार्य प्रमुख पाहुण्या शाहीन शेख यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
कार्यक्रमाला शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *