Sunday , May 31 2026
Breaking News

डॉ.आंबेडकरांच्यामुळेच समाज व्यवस्थेला नवी दिशा

Spread the love

आमदार शशिकला जोल्ले ; नगरपालिका आवारात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

निपाणी (वार्ता) : भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समता, न्याय आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अस्पृश्यता निर्मूलन, दलितांच्या हक्कांसाठी लढा आणि समाजात समानतेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. या दिवशी त्यांच्या स्मारकांना अभिवादन करून आणि त्यांच्या शिकवणींचे स्मरण करून समाजात समता आणि बंधुतेचा संदेश दिला जात असल्याचे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. येथील नगरपालिकेतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
नगरपालिका कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नगरपालिका आयुक्त गणपती पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. त्यानंतर नगरपालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार शशिकला जोल्ले व माजी नगरसेवकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, माजी सभापती सुनील पाटील, राजू गुंदेशा, प्रणव मानवी, नगरपालिका आयुक्त गणपती पाटील, बंडा घोरपडे, सुभाष कदम, अभियंते डी. बी. पठाण, प्रवीण कणगले, विनायक जाधव, विवेक जोशी, नागेंद्र बहादुरी, सुनील कांबळे, सागर मेस्त्री, शरद सावंत, उत्तम चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवक, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हालसिद्धनाथ साखर कारखान्यातील साखर चोरी प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्याची रयत संघटनेची मागणी

Spread the love  निपाणी (वार्ता) : दोन वर्षांपूर्वी निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यात पदाधिकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *