Sunday , September 20 2026
Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये आकर्षक विद्युत दीपस्तंभाचे उद्घाटन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील अंमलझरी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात राहुल मुगळे यांच्या संकल्पनेतुन साकार विद्युत दीपस्तंभ साकारण्यात आला आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा समावेश आहे. या विद्युत दीपस्तंभाचे उद्घाटन टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

दीपस्तंभावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. निकु पाटील यांनी, डॉ. आंबेडकर यांच्यासह महापुरुषांचे विचार दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असल्याचे सांगितले. यावेळी प्रवीण हेगडे, संभाजी मुगळे, दीपक इंगळे, राहुल माळगे, सचिन कांबळे, अब्दुल मकानदार, शुभम चौगुले, प्रज्वल कांबळे, आनंदा लोकरे, चेतन माने, प्रतीक मुगळे, पुंडलिक कांबळे, ओंकार मुगळे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *