
सहकाररत्न उत्तम पाटील; निपाणीत महामानवाला अभिवादन
निपाणी (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून नागरिकांना हक्क व न्याय मिळवून दिला आहे. संविधानामुळेच देशाचा कारभार सुस्थितीत चालू आहे. युवकांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून जीवनात वाटचाल करणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन सहकाररत्न उत्तम पाटील यांनी केले. येथील जत्राट वेस मध्ये आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सकाळी महिलांनी पाळणा सादर केला. त्यानंतर शहरात विविध ठिकाणी माणगाव आणि कोल्हापूर बिंदू चौकातून भीमज्यो आणण्यात आली होती.
जत्राट वेस येथील कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी दलित क्रांति सेनेचे संस्थापक अशोककुमार असोदे, माजी नगरसेवक रवींद्र शिंदे, दिलीप पठाडे, शौकत मनेर, शेरू बडेघर, जीवन घस्ते, संदीप माने, देवेंद्र घस्ते, इम्रान मकानदार, पप्पू शिंदे, नगरपालिका आयुक्त गणपती पाटील, शिरीष कमते, सुरज राठोड स्वप्निल कांबळे, अजय माने त्यांच्यासह जत्राट वेसमधील कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta