Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

भामट्याने लांबवली वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी

  बेळगाव : केबल टेक्निशियन असल्याचे सांगून घरात शिरलेल्या एका भामट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. ढोर गल्ली वडगाव येथे बुधवारी दुपारी ३.४२ च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान हा प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सदर भामटा घरात शिरला त्यावेळी त्या घरात फक्त दोन वृद्ध महिला …

Read More »

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह नदीत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू

  हुक्केरी : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह नदीत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या हुक्केरी तालुक्यातील नेगिनहाळ गावात ही दुर्दैवी घटना घडली. सुरेश बडिगेर (वय ५३) आणि जयश्री बडिगेर (वय ४५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. घटप्रभा नदीवरील पूल ओलांडत असताना दुचाकी पलटी होऊन हा अपघात झाल्याची माहिती घटनास्थळावरून प्राप्त …

Read More »

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी

  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैशवाणी समाजातर्फे बुधवारी रामनाथ मंगल कार्यालयात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री समा देवीची पूजा व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण झी मराठी प्रस्तुत हास्य सम्राट या कार्यक्रमाचे विजेते प्राध्यापक दीपक देशपांडे यांचा हास्य संध्या हा …

Read More »

उद्योजक संतोष पद्मन्नावर खून प्रकरणी पत्नीला अटक; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

  बेळगाव : उद्योजक संतोष पद्मन्नावर यांच्या हत्येप्रकरणी संतोषची पत्नी उमा हिला अटक केले. उमा हिच्यासह तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांची गुरुवारी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. संतोष पद्मन्नावर यांची पत्नी उमा हिला माळ मारुती पोलिसांनी  सकाळी ताब्यात घेतले व न्यायालयात हजर केले. आरोपी पत्नी उमा, …

Read More »

बेल्ट परीक्षेत पाच खेळाडूंना ब्लॅक बेल्ट प्रदान

  बेळगाव : इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा क्रीडा संघटनेच्यावतीने डॉ. जे. टी. सिमंड्स हॉलमध्ये घेण्यात आलेल्या बेल्ट परीक्षेत पाच खेळाडूंना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. विविध बेल्टसाठी झालेल्या या परीक्षेत एकूण 85 कराटेपटू सहभागी झाले होते. श्लोक गड्डी, यशस्विनी किल्लेकर, श्रद्धा अंगडी, मृणांक किल्लेदार व श्रेयस अंगडी ब्लॅक …

Read More »

आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी दिली मध्यवर्ती बसस्थानकाला भेट

  बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी मध्यवर्ती बसस्थानकाच्या सद्यस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि स्थानिक प्रवासी आणि ऑटो चालकांना प्रभावित करणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांबद्दल माहिती घेण्यासंदर्भात भेट दिली व  तेथील विकास कामाची पाहणी केली. बस स्थानकाची एकूण कार्यक्षमता वाढवणे हा आहे. त्यांच्या भेटीदरम्यान, सेठ यांनी ऑटोरिक्षा युनियनच्या प्रतिनिधींशी त्यांची …

Read More »

उद्योजक संतोष पद्मन्नावर हत्येप्रकरणी दोन आरोपीना अटक

  बेळगाव : उद्योजक संतोष पद्मन्नावर यांच्या हत्येप्रकरणी माळमारुती पोलिसांना रात्री उशिरा दोन आरोपींना अटक केली आहे. बेंगळुरू स्थित शोभित गौडा आणि आणखी एका आरोपीला पोलिसांनी हुबळी येथे अटक केली आणि बेळगावला आणले, तेथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. उमाचा फेसबुक फ्रेंड असलेल्या शोभित गौडाला उमाने ९ तारखेला फोन करून सर्व …

Read More »

उद्योजक खून प्रकरण : मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणी; पुढील प्रक्रिया पीएम अहवालानंतरच

  बेळगाव : उद्योजक संतोष पद्मण्णवर यांचा ९ ऑक्टोबर रोजी नैसर्गिक मृत्यू ठरलेल्या प्रकरणात त्यांच्या मुलीने खुनाची तक्रार दिल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. खुनाचा गुन्हा दाखल करून घेत पुरलेला मृतदेह बाहेर काढून बुधवारी तेथेच उत्तरीय तपासणी करण्यात आली. यानंतर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताच्या पत्नीसह पाच जणांविरोधात माळमारुती पोलिसांत …

Read More »

नवीन जलाशयाच्या बांधकामाला बसुर्ते ग्रामस्थांचा विरोध; बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बसुर्ते गावात नवीन जलाशयाच्या बांधकामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. 9 गावांना सतत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सरकारने 250 एकर जागेवर नवीन जलाशय बांधण्याचा घाट घातल्याचा निषेध बेळगाव तालुक्यातील बसुर्ते ग्रामस्थांनी केला. कोणत्याही कारणास्तव आपली जमीन देणार नसल्याचा इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसुर्ते गावातील शेतकरी …

Read More »

निवडणूक जाहीरनाम्यात सीमाप्रश्नाचा उल्लेख करावा : मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावच्या वतीने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवून येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्नासंबंधी आपापल्या पक्षाची भूमिका जाहीर करावी अशा प्रकारची पत्रे पाठविण्यात आली आहेत. या संदर्भात आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने इस्लामपूर येथे माजी कृषिमंत्री …

Read More »