बेळगाव : शिंदोळी येथील मंदिरात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांना पाहिल्यामुळे आपले पितळ उघडे पडू नये यासाठी चोरांनी येथील रहिवासी भारती पुजारी यांना विहिरीत ढकलून मारले. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली असून महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज मृत भारती पुजारी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी …
Read More »बेळगाव ते बाची रस्त्याची तात्पुरती डागडुजी
बेळगाव : पावसामुळे बिकट झालेल्या बेळगाव-बाची रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. गांधी चौक ते कुद्रेमानी या गावापर्यंतच्या रस्त्याची चाळण उडाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामकाजाला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी रस्त्याच्या संपूर्ण अवस्थेबाबत अहवाल देण्याच्या सूचना मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जाहीर आवाहन
बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत स्वातंत्र्य सेनानी व संयुक्त महाराष्ट्र चळवळतील नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार कोल्हापूरचे माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. महात्मा गांधी विचार मंच गडहिंगलज जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी …
Read More »महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात नागरिक रस्त्यावर
बेळगाव : भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेल्या बेळगाव महापालिकेवर बरखास्तीची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बेळगावातील विविध संघटनांनी आज निदर्शने केली. बेळगावात सोमवारी बेळगावातील विविध संघटनांनी मनपातील भ्रष्टाचाराला आळा घालावा, मनपा बरखास्त करण्यात यावी, या मागणीसाठी भव्य निषेध रॅली काढली. यावेळी घोषणाबाजी करून संताप व्यक्त करण्यात आला. शहरातील राणी चन्नम्मा सर्कल …
Read More »2 ऑक्टोबर रोजी साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन
बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे, बेळगुंदी बालवीर विद्यानिकेतनमध्ये दोन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार, प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे, प्रा.सौ. मानसी दिवेकर कोल्हापूर यांचे साहित्य लेखन कसे करावे, या विषयावर मार्गदर्शन केले जाणार …
Read More »दक्षिण उपनोंदणी कार्यालयाचे जिल्हाधिकारी आवारामध्ये स्थलांतर
बेळगाव : बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालय दक्षिण भागात स्थलांतरित केल्याने अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. याचा विचार करून सदर कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्थलांतरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावला आहे. दक्षिण उपनोंदणी कार्यालय भाडीत्रो इमारतीत असल्याने सरकारचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच हे कार्यालय शहरापासून सात …
Read More »विद्या आधार योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत
बेळगाव : रद्दीतून बुद्धी या आशयांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विद्या आधार या योजनेच्या माध्यमातून आज जीआयटी महाविद्यालयातील एका गरजू विद्यार्थ्याला आर्थिक सहकार्य करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्याहस्ते विद्यार्थ्याला १० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. विद्या आधार योजना ही जुन्या कचऱ्यातून जमा झालेल्या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक …
Read More »दुर्गवीर प्रतिष्ठान, श्री दुर्गसेवा बेळगाव यांच्याकडून भुईकोट किल्ला स्वच्छता मोहीम
बेळगाव : नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने दुर्गवीर प्रतिष्ठान बेळगाव-चंदगड विभाग व श्री दुर्गसेवा बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव किल्ला स्वच्छता मोहीम फत्ते झाली. गडावरील श्री दुर्गा माता मंदिरात नवरात्री उत्सव मिलिटरी मार्फत मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्याचीच पूर्वतयारी म्हणून मुख्य प्रवेशद्वार, बुरुज आणि लगतची तटबंदी वरील अतिप्रमाणात वाढलेली झाडेंझुडूपे काढून टाकण्यात …
Read More »विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
कागवाड : कागवाड तालुक्यानजीक असलेल्या महाराष्ट्रातील म्हैसाळ (ता. मिरज) गावात विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी शेतकरी असलेल्या वनमोरे कुटुंबातील चौघेजण गुरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी उसाच्या शेतात विजेची तार तुटून जमिनीवर पडली होती. याकडे लक्ष न देता …
Read More »ग्रामीण व यमकनमर्डीमधून मध्यवर्ती म. ए. समितीवर 25 जणांची नावे जाहीर
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची नियंत्रण या घटक समितीची बैठक रविवार दिनांक २९ रोजी मराठा मंदिर मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाहन केल्याप्रमाणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta