बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या वास्तूत सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या या सभेस मंडळाच्या सर्व आजीव सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे व कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी केले आहे.
Read More »बेळगाव महापालिकेला आणखी एक धक्का; मूळ मालकाला जमीन परत
खंजर गल्ली – जलगार गल्लीतील खाजगी जमिनीवर रस्ता बांधकामाचे प्रकरण बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या हद्दीत खासगी जमिनीवर बांधलेला रस्ता मोकळा करून मूळ मालकाला परत केल्याची आणखी एक घटना घडली आहे. पंधरा वर्षांपूर्वी बेळगावमधील खंजर गल्ली-जालगार गल्ली येथे मकबूल आगा यांच्या मालकीच्या ८०० चौरस फूट जागेवर रस्ता तयार करण्यात …
Read More »एनपीएस रद्द करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
बेळगाव : राज्य काँग्रेस सरकारने जाहीरनाम्यात जाहीर केल्याप्रमाणे ओपीएसची अंमलबजावणी करावी, अशी मागणी एनपीएस एम्प्लॉईज युनियनचे जिल्हाध्यक्ष एन. टी. लोकेश यांनी केली. एनपीएस राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सरकारला, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेली नवीन पेन्शन योजना रद्द करण्याची आणि राजस्थान मॉडेलवर जुनी पेन्शन प्रणाली सुरू ठेवण्याची विनंती केली. एनपीएस योजनेमुळे …
Read More »अथणी येथील एका तरुणावर अज्ञातांचा जीवघेणा हल्ला
अथणी : कांही दिवसांपूर्वी अथणी तालुक्यातील काकमरी गावात जमीन विक्रीसाठी असल्याची माहिती अथणी शहरातील शशिकांत लक्ष्मण आक्केण्णावर या तरुणाला मिळाली. त्यानुसार सदर तरुण जमीन पाहण्यासाठी गेला असता तेथील एका महिलेसह ६ अनोळखी व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला. तरुणाच्या मांडीवर लाथ मारण्यात आली असून या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. …
Read More »मंदिरातील दागिने चोरट्यांनी चोरून महिलेला विहिरीत ढकलले
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावातील मसणाई देवस्थानाच्या पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या विहिरीत एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. या देवस्थानातील चांदीचे दागिने चोरीला गेले असून मंदिरातून दागिने चोरणाऱ्या चोरट्यांनी महिलेला विहिरीत ढकलून तिची हत्या केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. भारती पुजारी (रा. शिंदोळी, वय ४८) असे मृत महिलेचे नाव असून …
Read More »मंगाई नगर तलावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
बेळगाव : वडगावमधील मंगाईनगर तलावात आज सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. स्थानिकांनी माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही व्यक्ती दोन-तीन दिवसांपूर्वी पाण्यात पडली असावी, अशी माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली आहे. सदर घटना शहापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली असून पुढील …
Read More »विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीराचे संघ रवाना
बेळगाव : कुरुक्षेत्र हरियाणा येथे 28 ते 2 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक मुलींच्या फुटबॉल संघ गुरुवार तारीख 26 रोजी सायंकाळी गोवा हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसने रवाना झाले आहेत. या संघाला शाळेचा माजी विद्यार्थी ओमकार देसाई यांनी फुटबॉल …
Read More »शाळेतील दत्तक योजनेसाठी दिली आर्थिक मदत
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेसाठी ज्योती कॉलेजच्या निवृत्त प्राध्यापिका सौ. ज्योती मधुकर मजुकर, श्रीमती कस्तुरी अशोकराव पवार, सौ नीलम शिवाजीराव नलावडे यांनी रोख रुपये 60000/- (साठ हजार रुपये) देणगी दिली आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील, खजिनदार एन. …
Read More »सुवर्णलक्ष्मी सोसायटीला 46 लाखाचा निव्वळ नफा
बेळगाव : येथील श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटीला गेल्या आर्थिक वर्षात 46 लाख 6 हजार रुपयाचा निव्वळ नफा झाला असून या सोसायटीकडे 20 कोटी 62 लाख रुपयाच्या ठेवी आहेत. तर सोसायटीने आपल्या सभासदांना 17 कोटी 66 लाख रुपयाच्या कर्जाचे वाटप केले आहे, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन श्री. विठ्ठल शिरोडकर …
Read More »नैतिकता स्वीकारून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा; निजदची बेळगावात निदर्शने
बेळगाव : मुडा घोटाळ्यात अडकलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, जर राजीनामा दिला नाही तर निजद तीव्र लढा देत राहील, असा इशारा निजदचे शंकर माडलगी यांनी दिला. उच्च न्यायालय आणि लोकप्रतिनिधी न्यायालयाच्या आदेशानंतर मुडा घोटाळ्यात अडकलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta