बेळगाव : नावगे येथील स्नेहम इंटरनॅशनल कारखान्याला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मार्कंडेयनगर येथील यल्लप्पा गुंड्यागोळ या तरुणाच्या कुटुंबीयांची मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट घेतली. यावेळी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मृत तरुणाच्या आई-वडीलांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. अशी घटना घडणे दुर्दैवी आहे, ही घटना घडायला …
Read More »येळ्ळूरच्या ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीचा उद्या अभिषेक कार्यक्रम
येळ्ळूर : श्री ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवीचा सालाबाद प्रमाणे मंगळवार दिनांक 13/8/2024 रोजी सकाळी ठीक 8.00 वा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने त्या कार्यक्रमाचे सर्व आयोजन करण्यासाठी मंगळवार दिनांक 6/8/2024 रोजी श्री चांगळेश्वरी युवक मंडळाच्या कार्यालयात बैठक बोलवण्यात आली आहे. त्या बैठकीमध्ये पुढील विषयावर चर्चा होऊन मंगळवार दिनांक 13/8/2024 …
Read More »कोनेवाडीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
बेळगाव : शेतात काम करत असताना थेट खराब झालेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी गावच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. 10 रोजी घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, भरमा पावशे हे आपल्या पत्नीसह शेतात काम करत होते. पण अनावधानाने त्यांना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याचे लक्षात आल्याने …
Read More »बाप्पाच्या आगमनाची चाहूल, बेळगावच्या राजाचे मुहूर्तमेंढ मोठ्या दिमाखात संपन्न
बेळगाव : नवसाला पावणारा राजा अशी ख्यात असलेल्या बेळगावच्या राजाचे आज 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गणेश मंडप मुहूर्तमेंढ संपन्न झाले. बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे बेळगावच्या राजाचे गणेश मंडप मुहूर्तमेंढ पूजन रविवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, माजी आमदार अनिल बेनके व …
Read More »14 ऑगस्ट रोजी “अखंड हिंदुस्थान संकल्प दिन”; शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील यांची उपस्थिती
बेळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानुगडे -पाटील हे येत्या बुधवार दि. 14 ऑगस्ट रोजी बेळगाव भेटीवर येत आहेत. या दिवशी रात्री 8 वाजता श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगावतर्फे आयोजित अखंड हिंदुस्थान संकल्प दिन सोहळ्यास ते प्रमुख पाहुणे/वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे 14 …
Read More »भाषेवर बंधन म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासावर बंधने : गिरीश पतके
गुरुवर्य वि. गो. साठे प्रबोधनीच्या वतीने बक्षीस वितरण सोहळाचे आयोजन बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनी यांच्यावतीने निबंध व सामान्य ज्ञान परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून राज्य मराठी विकास संस्थेचे कार्यासन अधिकारी सन्माननीय गिरीश पतके …
Read More »भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी पावले उचलावीत : विश्व हिंदू परिषदची मागणी
बेळगाव : भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवून हिंदूंच्या रक्षणासाठी पावले उचलावीत, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे उत्तर प्रदेश, कोषाध्यक्ष कृष्णा भट यांनी केली. आज बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेच्या संदर्भात ते बोलत होते. बांगलादेशात हिंदूंवर दिवसेंदिवस अत्याचार होत असून अनेक लोक मारले जात आहेत. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या …
Read More »हिंडलगा कारागृहावर पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली छापा
बेळगाव : अनेक वादांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या बेळगाव येथील हिंडलगा कारागृहावर पहाटे पोलिसांनी अचानक धडक दिली. पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग यांच्या नेतृत्वाखाली हा छापा घालण्यात आला. या छाप्यात कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांच्यासह २६० हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते. छाप्यादरम्यान पोलिसांनी तंबाखूचे …
Read More »मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभागची उद्या बैठक
बेळगाव : मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ, शहापूर विभागातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक रविवार दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजता बलभीम व्यायाम मंडळ सांस्कृतिक भवन, नवी गल्ली, शहापूर या ठिकाणी बोलाविण्यात आली आहे. तरी शहापूर विभागील शहापूर, होसूर, खासबाग, भारत नगर, वडगांव, जुने बेळगांव, आदी …
Read More »श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉम अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा
बेळगाव : गणेशोत्सवात मिरवणूक मार्गावर कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत लोकमान्य टिळक गणेश महामंडळाच्या मागणीनुसार मिरवणूक मार्गावरील विविध चौकात लोंबकळत असलेल्या विद्युत तारांची शुक्रवारी सकाळी शहर अभियंता संजीव हमन्वर यांच्या नेतृत्वाखाली पाहणी करण्यात आले. यावेळी उपस्थित लोकमान्य महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, गिरीष धोंगडी, सुनिल जाधव उपस्थित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta