Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

अथणी येथे ऑटोमोबाईल दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरातील जत रोडवर असलेल्या एका ऑटोमोबाईल दुकानाला काल रात्री उशिरा भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला. अथणी शहरातील रहिवासी बसवराज यांच्या ऑटोमोबाईल दुकानातील लाखो रुपयांची वाहने, वाहनांचे सुटे भाग व सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अथणी अग्निशमन दलाने …

Read More »

यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा अपयशाला घाबरू नका : राहुल पाटील

  बेळगाव : तुमच्या आयुष्यात रोल मॉडेल असणे फार महत्त्वाचे आहे. त्यांचे मार्गदर्शन घ्या. आयुष्यात कोणत्याही पदावर गेला तरी आपल्या मातीला विसरू नका, उच्च ध्येय गाठत असताना येणाऱ्या अडचणी व अपयश यांना खचून न जाता सतत प्रयत्नशील राहून यश मिळवता येते, असे उद्गार कलखांब गावचे सुपुत्र व 2023 च्या नागरी …

Read More »

दूधगंगा पूर बाधित क्षेत्रातील समस्याग्रस्त पशुधारक शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहर परिसरातील दूधगंगा नदीला आलेल्या महापूर क्षेत्रातील अनेक पशुधारक व दूध उत्पादक शेतकरी गेल्या 17 दिवसापासून मोठ्या पावसात भिजत उघड्यावर आहेत. त्या पूरग्रस्त पशुधारकांना पशुसाठी चारा, पाणी, निवारा आणि वैद्यकीय सुविधा कोणत्याही प्रकारच्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या …

Read More »

महापौरांच्या हस्ते राकसकोप जलाशयावर गंगापूजन

  बेळगाव : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारा राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून आज बेळगाव महापौर व उपमहापौरांच्या हस्ते येथे विधिवत गंगा पूजन करण्यात आले. बेळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच पश्चिम घाटात, पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्या प्रवाहित होऊन पाण्याची पातळी वाढल्याने राकसकोप जलाशय …

Read More »

श्रावणी सोमवारनिमित्त दक्षिण काशी सजली; भाविकांची गर्दी

  बेळगाव : आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्त बेळगावच्या श्री क्षेत्र दक्षिण काशी, श्री कपिलेश्वर देवस्थानात श्री कपिलनाथाची विशेष आरास करून धार्मिक विधी पार पाडण्यात आल्या. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त बेळगावच्या श्री क्षेत्र दक्षिण कशी श्री कपिलेश्वर मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण महिन्यात महादेवाची आराधना केली जाते. …

Read More »

अलतगा दुर्घटनेतील “त्या” युवकाच्या कुटुंबाला ५ लाखाचा धनादेश

  बेळगाव : दोन दिवसांपूर्वी पाण्यात वाहून गेलेल्या अलतगा येथील ओंकारा अरुण पाटील या तरुणाच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ५ लाखांची मदत दिली आहे. बेळगाव जिल्ह्यातील पुराचे निरीक्षण करून परतत असताना मुख्यमंत्र्यांनी विमानतळावर मृत ओंकारच्या आईकडे ५ लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व महिला व …

Read More »

विजेच्या धक्क्याने सुळेभावीत दोन महिलांचा मृत्यू

  बेळगाव : श्रावण सोमवारी एका मंदिरात साफसफाई करताना दोन महिलांना विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथे घडली आहे. सुळेभावी गावातील वाल्मिकी मंदिराची साफसफाई सुरू असताना ही घटना घडली. मंदिराची साफसफाई आणि मंडप लावताना कलावती बिदरवाडी (३७) आणि सविता ओंटी (३६) यांचा जागीच मृत्यू …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाहायला गेलेल्या तरुणाला बसला विजेचा धक्का

  बेळगाव : कागवाड तालुक्यातील जुगुळ गावात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला विजेचा धक्का बसल्याने गंभीर दुखापत झाली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या जुगुळ गावाच्या दौऱ्यावर असताना विजेचा धक्का लागून 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी छतावर चढलेल्या महेश या तरुणाला विजेचा धक्का बसला आणि त्याच्या चेहऱ्याला आणि हाताला गंभीर …

Read More »

अतिवृष्टीमुळे खानापूर, बेळगाव ग्रामीण व कित्तूर तालुक्यातील अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर

  खानापूर : बेळगाव जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे, बेळगाव ग्रामीण, खानापूर तालुका आणि कित्तूर तालुक्यांतील अंगणवाड्यांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, यांनी एका आदेशान्वये दिली आहे. खानापूर तालुका, बेळगाव ग्रामीण आणि कित्तूर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे बालकांना अंगणवाड्यांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यासाठी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून, मंगळवार …

Read More »

गोकाकमधील पूरग्रस्त भागाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या समस्या

  बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित गोकाकमधील विविध भागांना भेट दिली आणि काळजी केंद्राची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत असलेल्या घटप्रभा नदीवरील जलमय झालेल्या लोळसूर पुलाची पाहणी केली. यावेळी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी नवीन पूल बांधण्याचे आवाहन केले. यानंतर त्यांनी लोळसूर पुलाजवळ आठवडाभरापासून बॅकवॉटरने तुंबलेल्या …

Read More »