Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

आंदोलन करून परतत असताना झालेल्या अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू

  कित्तूर तालुक्यातील घटना बेळगाव : गावात बसची व्यवस्था करावी या मागणीसाठी आंदोलन करून घरी जात असताना झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या. आठवीच्या वर्गात अक्षता हुलीकट्टी (१४) हि शिकत होती. कित्तूर तालुक्यातील निच्छनीके गावाजवळ हा अपघात घडला. गावात बस वेळेवर येत नसल्याने …

Read More »

प्रगतिशील लेखक संघाच्या बैठकीत डॉ. पी. डी. कुलकर्णी यांचा स्मृतिदिन

  बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या साप्ताहिक बैठकीत डॉ. पी. डी. कुलकर्णी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी डॉ. कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. डॉ. कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. 1942 च्या आंदोलनात कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन सेक्रेटरी …

Read More »

बेळगावमधील शिक्षण संस्थानांची कर्नाटकाच्या शिक्षण मंत्र्यांशी भेट

बेळगाव : बेळगावमधील शैक्षणिक संस्थानांनी कर्नाटकाचे शिक्षण मंत्री माननीय श्री. बी. सी. नागेश यांच्याशी भेट घेतली व काही शैक्षणिक अडचणीबाबत चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले. यावेळी श्री. बी. सी. नागेश यांनी बोलताना म्हणाले, अडचणींचा पाठपुरावा घेऊन त्या तात्काळ सोडवू व लवकरात लवकर सुधारणा घडवून आणू. यावेळी बेळगाव कर्नाटक …

Read More »

बेळगावात नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी

  बेळगाव : नवीन वर्षाच्या स्वागताची बेळगावात जय्यत तयारी सुरु आहे. तरुणाई आज संध्याकाळी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करण्यासाठी सज्ज झाली आहे तर ओल्ड मॅन बनवण्यात बच्चे कंपनी बिझी आहे. गेली दोन-तीन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे बेळगावकरांना नववर्षाचे स्वागत भव्य प्रमाणात करता आले नव्हते. त्यामुळे सगळ्यांचाच हिरमोड झाला …

Read More »

अनिल बेनके टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला 6 जानेवारीपासून प्रारंभ : आ. अनिल बेनके

  बेळगाव : बेळगावमधील सरदार मैदानावर 6 ते 22 जानेवारी दरम्यान ऑल इंडिया ओपन फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी देशभरातून संघ बेळगावात येणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. शुक्रवारी शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, अनिल बेनके टेनिस …

Read More »

सीमाभागात मराठी भाषेचे संवर्धन करणाऱ्या मराठी संघ-संस्थांना महाराष्ट्र शासनाकडून अनुदान

  बेळगाव : महाराष्ट्र -कर्नाटक सीमाभागातील महाराष्ट्राने दावा केलेल्या 865 गावातील मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन व अभिवृद्धीसाठी राज्य शासनाने योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत सीमाभागात मराठी भाषेचे संवर्धन करणाऱ्या मराठी संघ संस्थांना दहा लाख पर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने ही योजना राबविण्यात …

Read More »

माजी आमदार कल्लाप्पा मेघन्नावर यांच्या गाडीला अपघात

बेळगाव : माजी आमदार आणि जेडीएस नेते कल्लाप्पा मेघन्नावर यांच्या कारला बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहराच्या हद्दीत अपघात झाला. विजयपूरहून चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावाकडे येत असताना हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. समोरून येणाऱ्या लॉरीचा टायर फुटून माजी आमदारांच्या गाडीवर पडला. कारमधील मेघन्नावरसह अन्य सहा जण किरकोळ जखमी झाले. ही …

Read More »

मंडोळी हायस्कुलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मंडोळी हायस्कुल मंडोळी येथे गुरुवार दि 29/12/2022 रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पथसंचलनाने प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. जी. पी. मिसाळे यांनी केले. ध्वजारोहण श्री. परशराम भावकू पाटील यांच्याहस्ते झाले तर क्रीडाज्योत लक्ष्मीट्रेडरचे मालक श्री. …

Read More »

गरोदर महिलेची सासरच्यांकडून हत्या; आरोपींना त्वरित अटक करा

  बेळगाव : तीन महिन्यांची गरोदर असलेल्या महिलेचा खून करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या सासरच्या लोकांना अटक न करून हे प्रकरण दडपू पाहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करत कर्नाटक रक्षण वेदिके स्वाभिमानी गट आणि न्यू वंटमुरी ग्रामस्थांनी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. यावेळी त्यांनी बेळगावचे …

Read More »

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यशस्वी : अध्यक्ष कागेरी

  बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अतिशय यशस्वी झाले आहे. बेळगाव जिल्हा प्रशासनाने तसेच पोलीस विभागाने निवास, भोजन, वाहतुकीसह सर्व व्यवस्था केल्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी त्यांचे कौतुक केले. बेळगावच्या सुवर्ण विधानसौध येथे १९ डिसेंबरपासून सुरू असलेले नऊ दिवसांचे हिवाळी अधिवेशन यशस्वीपणे पार पडल्याच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी …

Read More »