Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

गुरुपौर्णिमेनिमित्त कंग्राळ गल्ली येथे आयुष्यमान कार्डची नोंदणी

  बेळगाव : आज कंग्राळ गल्ली येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयुष्यमान कार्डची विनामूल्य नोंदणी करण्यात आली. गल्लीतील सर्व नागरिकांना याचा लाभ मिळावा या उद्देशाने गल्लीतील युवकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन गल्लीतील पंचमंडळीच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. शंकर बडवाण्णाचे, …

Read More »

प्रगती इंजिनिअरिंगमध्ये वृक्षारोपण

  बेळगाव : सामाजिक आणि निसर्गाप्रती असणारी जाणिव राखत प्रगती इंजिनिअरिंग बेळगाव प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कामगार आणि ग्रीन सेविअर बेळगाव यांनी वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात वनमहोत्सव साजरा केला. रविवारी स्वदेशी 60 पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली. त्यावेळी ग्रीन सेविअर ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. जयंत लिंगडे सर तसेच प्रगती इंजीनियरिंगचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. …

Read More »

रोटरीच्या पुढाकारामुळे दोन वर्षीय बालिकेला मिळाले जीवदान

  बेळगाव : अपघातामुळे ब्रेन डेड झाल्याने सौंदत्ती येथील हिरेबुदनूर गावातील २४ वर्षीय हणमंत सारवी यांच्या कुटुंबीयांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. या दुःखाचा सामना करत असूनही कुटुंबीयांनी घेतलेला अवयव दानाचा निर्णय कौतुकास्पद ठरला. पण दुर्दैवाने वडिलांच्या अवयव दानानंतर २ वर्षीय मुलीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. मात्र कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती …

Read More »

साधना क्रीडा संघाच्या वतीने प्रा. आनंद मेणसे यांचा सत्कार

  बेळगाव : मनोरमा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्याकडून प्रा. आनंद मेणसे यांनी केलेल्या पत्रकारितेबद्दल व साहित्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल साधना क्रीडा संघ यांच्या वतीने ज्येष्ठ सदस्य श्री. प्रकाश देसाई यांच्या हस्ते प्राचार्य आनंद मेणसे यांचा शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच साधना क्रीडा संघाचे खेळाडू …

Read More »

सीए परीक्षेत उत्तीर्ण माजी विद्यार्थ्यांचा मराठी विद्यानिकेतनमध्ये सत्कार

  बेळगाव : 2024 या वर्षातील सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेले मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी पवन मारीहाळ, ओमकार सुतार व स्वप्नील पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर उपस्थित होते. व्यासपीठावर शाळेचे माजी विद्यार्थी व प्रमुख पाहुणे आय आर …

Read More »

सौंदत्तीजवळ दुचाकींचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

  उगारगोळ : हिरेकुंबीजवळ शुक्रवारी सायंकाळी दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. बसवराज प्रभुनावर (वय 48, रा. सौंदत्ती), यल्लाप्पा कोरविनकोप्प (46, रा. हंचिनाळ) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामदुर्गचे डीवायएसपी पांडुरंगय्या आणि सौंदत्तीचे सीपीआय डी. एस. …

Read More »

तलाठ्याच्या गाडीत सापडले १ कोटी दहा लाख रुपये..

  बेळगाव : एक तलाठी आपल्या कारमध्ये 1 कोटी 10 लाख रुपये घेऊन जात असताना पोलिसांनी छापा टाकून कागदोपत्री नोंद नसलेली रक्कम जप्त केली. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हलगट्टी चेकपोस्टजवळ पोलिसांनी ग्राम लेखापालाची गाडी अडवली असता त्यांना तलाठ्याच्या गाडीत रुपये सापडले व ते जप्त केले. निपाणी तालुक्यातील ग्राम लेखापाल असलेल्या …

Read More »

समादेवी मंदिराबाबत अधिसूचना काढणे चुकीचे

  बेळगाव : धर्मादाय खात्याने चुकीच्या माहितीच्या आधारे समादेवी मंदिरावर सरकारी समिती स्थापन करण्याबाबत अधिसूचना काढली आहे, असा दावा करत समादेवी मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवार दि. १८ धर्मादाय खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर निर्णय घेऊ नये, अशी विनंती केली. त्यामुळे सरकारी समितीच्या यादीतून समादेवी मंदिराचे नाव वगळण्यात येईल, …

Read More »

बेळगाव हेस्कॉम ग्राहकांची तक्रार निवारणासंदर्भात उद्या बैठक

  बेळगाव : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाची मासिक बैठक शनिवारी 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हेस्कॉम सहाय्यक कार्यकारी अभियंता उपविभाग 1, बेळगाव यांच्या कार्यालयात होणार आहे. वीज पुरवठा, बिलिंग व वीज विभागाच्या इतर समस्यांबाबत ग्राहकांना त्यांचे नाव, आरआर क्रमांक, पत्ता व मोबाईल क्रमांकासह लिखित सूचना या बैठकीत देता …

Read More »

कन्नडिगांना नोकरीत आरक्षण मिळावे; करवे प्रवीण शेट्टी गटाची बेळगावात निदर्शने

  बेळगाव : कन्नडिगांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज करवे प्रवीण शेट्टी ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी “कन्नडीगांचा स्वाभिमान दुखावणाऱ्या उद्योगपतींचा धिक्कार असो ” कन्नडिगांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटाच्या एका नेत्याने सांगितले की , …

Read More »