Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्षांना कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या वतीने निवेदन

  बेळगाव : कर्नाटक मराठा क्षत्रिय फेडरेशनच्या वतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर “चलो सुवर्णसौध”ची हाक देण्यात आली आहे. 20 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता बेळगावच्या सुवर्ण विधानसौध समोर कर्नाटक राज्यातील मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या वतीने आज सोमवारी विधानसभा अध्यक्ष विश्वनाथ कागेरी …

Read More »

सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने सीमाभाग केंद्रशासित करा

  बेळगुंदी साहित्य संमेलनात ठराव बेळगाव : सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने निकाल लागेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा, असा ठराव आज पार पडलेल्या बेळगुंदी मराठी साहित्य संमेलनात पारित करण्यात आला. श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या वतीने आज रविवारी बेळगुंदी येथे मरगाई मंदिराच्या आवारात १७ वे बेळगुंदी मराठी साहित्य संमेलन विविध सत्रात पार पडले. …

Read More »

माजी मंत्री रमेश जारकीहोळी समर्थकांची नागपूर वारी

  बेळगाव : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपले समर्थक आणि विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या दोन्ही उमेदवारांना घेऊन नागपूरवारी केलेली आहे. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवारीसाठी इच्छुक असलेले मराठा समाजातील हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर त्याचप्रमाणे दक्षिण मतदारसंघातून इच्छुक असलेले किरण जाधव यांना घेऊन माजी मंत्री व …

Read More »

ग्रामीण भागात उच्च शिक्षणासाठी प्रयत्न : आ. लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : सर्वच बाबतीत मागासलेल्या बेळगावच्या ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी मी गेली साडेचार वर्षे प्रथम प्राधान्याने काम करत आहे. मुलींसह कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये हा माझा हेतू आहे. आगामी काळात उच्च शिक्षणाची व्यवस्था घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. …

Read More »

मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस

  बेळगाव : येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालयात मानवी हक्क दिवस एन.एस.एस.,एन.सी.सी. आणि आयक्यूएसीतर्फे आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला वाणिज्य विभागाच्या प्रा.अर्चना भोसले या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात नँक समन्वय अधिकारी …

Read More »

19 डिसेंबर रोजी शेतकरी संघटना हजारोंच्या संख्येने घालणार सुवर्णसौधला घेराव!

  बेळगाव : येत्या 19 डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य रयत संघटन आणि हसीर सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य रयत संघटनेचे कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी दिली. बेळगाव शहरातील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या आंदोलनाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांना जास्त खोटे …

Read More »

बेळगुंदीत 17 वे मराठी साहित्य संमेलन उद्या

  बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि. 11 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 17 वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. बेळगुंदी येथील मरगाई देवस्थान परिसरातील ज्येष्ठ साहित्यिक …

Read More »

कोल्हापूरात घुमला सीमावासीयांचा बुलंद आवाज!

  महाविकास आघाडीतर्फे शाहू समाधीस्थळ येथे आंदोलन, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध कोल्हापूर : कर्नाटक सरकारच्या विरोधात तसेच महापुरुषांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. बेळगाव-निपाणी-कारवार-बिदर- भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा नारा दुमदुमला. “नही चलेगी नही चलेगी-दादागिरी नही चलेगी”असा इशारा कर्नाटक सरकारला दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी …

Read More »

मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाविकास आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन

  कोल्हापूर : कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर भाजप नेत्याकडून वेळोवेळी होणाऱ्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरातील शाहू समाधी स्थळ या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, …

Read More »

महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर म. ए. समितीची पोलिसांशी चर्चा

  बेळगाव : कर्नाटक सरकारला मराठी भाषकांची ताकद दाखवून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 19 डिसेंबरला महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी कर्नाटक सरकारतर्फे बेळगावात होणाऱ्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन केले जाते. महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. अधिवेशन काळात …

Read More »