Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

घुमटमाळ मारुती मंदिर : नूतन पदाधिकाऱ्यांचा स्वागत समारंभ

बेळगाव : हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर पब्लिक ट्रस्टच्या कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्याचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी संपन्न झाला. नूतन अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांचे स्वागत मावळते अध्यक्ष अनंत लाड यांनी केले तर नूतन उपाध्यक्ष कुलदीप भेकणे यांचे स्वागत रघुनाथ बांडगी यांनी आणि नूतन चिटणीस प्रकाश माहेश्वरी यांचे स्वागत गोपाळराव बिर्जे …

Read More »

दसर्‍यानंतर महाराष्ट्र, केरळ सीमेवरील कोविड निर्बंध शिथील

मुख्यमंत्री बोम्माई : दसर्‍यानंतरच प्राथमिक शाळांबाबत निर्णय बंगळूरू : महाराष्ट्र आणि केरळ राज्यासह सीमावर्ती जिल्ह्यात लादण्यात आलेले कोविड निर्बंध दसरा सणानंतर शिथिल करण्याबाबत सरकार निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी सांगितले. प्राथमिक शाळा सुर करण्याबाबतही त्याचवेळी निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री …

Read More »

नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल चुकीची माहिती पसरत आहे : उच्च शिक्षण मंत्री अश्वथनारायण

बेळगाव : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल चुकीची माहिती पसरविण्यात येत असून नवे शिक्षण धोरण सर्वांसाठी फायद्याचे असल्याचे मत कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण यांनी व्यक्त केले. बेळगावमधील केएलईएस संस्थेच्या कॅम्पसमधील जिरगे हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल चुकीची माहिती पसरविण्यात येत असल्यासंदर्भात …

Read More »

उचगावमधील रस्ते-गटारीचे काम शास्त्रीय पद्धतीने करा

ग्रामस्थांचे खासदारांना साकडे उचगाव : उचगावमधील लक्ष्मी गल्ली आणि गणपत गल्लीत सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे रस्ता व गटार निर्माण काम अशास्त्रीय पद्धतीने करण्यात येत आहे. ते शास्त्रीय पद्धतीने, लोकांना अनुकूल होईल अशारीतीने करण्याची मागणी ग्रामस्थांतर्फे खा. मंगल अंगडी यांच्याकडे करण्यात आली आहे. उचगावमधील लक्ष्मी गल्ली आणि गणपत गल्लीतील रहिवाशांनी बुधवारी खा. …

Read More »

तालुका आरोग्याधिकार्‍यांच्या निषेधार्थ बेळगावात निदर्शने

बेळगाव : ‘आयुष’ डॉक्टर्स हे बोगस डॉक्टर्स असल्याचे विधान तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तिहोळी यांनी केले आहे. त्याच्या निषेधार्थ आयुष फेडरेशनच्या बेळगाव तालुका शाखेतर्फे निदर्शने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. बेळगाव तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तिहोळी यांनी एका वृत्तपत्राला ‘आयुष’ डॉक्टर्स हे बोगस डॉक्टर्स असल्याचे सांगितले होते. त्याच्या निषेधार्थ डॉ. …

Read More »

आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते वंटमुरी कॉलनीतील कामाचा शुभारंभ

समाज कल्याण विभागातून निधी मंजूर बेळगाव : समाज कल्याण विभागातून येथील वंटमुरी कॉलनीतील विकास कामाला चालना देण्यात आली आहे. या भागात अनेक दिवसांपासून रस्ते, गटार, ड्रेनेज, पथदीप यासह अनेक सुविधांचा अभाव होता. त्यामुळे येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन या भागातील विकास कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. सदर कामाचा शुभारंभ आमदार …

Read More »

चोरटा गजाआड : 11 मोटरसायकली जप्त

बेळगाव : माळमारुती पोलिसांनी एका अट्टल मोटरसायकल चोरट्याला गजाआड करून त्याच्याकडील सुमारे 7 लाख रुपये हुन अधिक किमतीच्या 11 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमणी आणि माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहर आणि …

Read More »

कुंचीमुळे श्वास गुदमरून अर्भकाचा मृत्यू

बेळगाव : डोक्याला घालण्याची कुंचीची दोरी गळ्याभोवती आवळली गेल्यामुळे अवघ्या सहा दिवसांच्या स्त्री जातीच्या एका अर्भकाचा श्वास गुदमरून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नेहरूनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, हिंडलगा येथील ज्योती सागर जाधव (वय 21) या महिलेला बाळंतपणासाठी नेहरूनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल …

Read More »

बेळगावात पुन्हा कानडी दादागिरी, मराठी बांधवांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली!

राज्योत्सव मात्र कोविड नियमावलीनुसार साजरा करणार बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमालढ्याचे केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव शहरात 1 नोव्हेंबर हा दिवस सीमाभाग महाराष्ट्रापासून तोडून कर्नाटकात घेतला गेल्याच्या निषेधार्थ काळा दिवस म्हणून पाळला जातो. गेल्या सहा दशकात यात कधीही खंड पडला नाही आणि सदनशीर मार्गाने मूकफेरी काढून सीमावासीय मराठी जनता आपला निषेध व्यक्त …

Read More »

मंत्रिपदासाठी आ. रमेश जारकीहोळींची थेट दिल्लीतून फिल्डिंग

बेळगाव : मध्यंतरी काही काळ शांत बसलेल्या गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची कुणकुण लागल्याने त्यांनी आता दिल्ली गाठली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची खबर लागल्याने आ. रमेश जारकीहोळी यांनी दिल्ली गाठली आहे. याआधी हात दिलेले मंत्रिपद येनकेन प्रकारे …

Read More »