बेळगाव : बेळगाव शहरातील रामनगर (शिव-बसव नगर) प्रभागातील एकाच परिसरात असलेल्या 4 सरकारी प्राथमिक (2-मराठी, 1-कन्नड व 1-उर्दु) शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपतर्फे खेळाचे साहित्य वितरीत करण्यात आले. या शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे गरीब व कष्टकरी कामगारांच्या कुटुंबातील आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेत खेळण्याचे कोणतेही साहित्य दिसत नाही …
Read More »कंग्राळी खुर्द येथे हुतात्म्यांना अभिवादन!
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथे अभिवादन करण्यात आले. यानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहून गावात फेरी काढण्यात आली. बेळगावसह सीमाभाग हा तत्कालीन म्हैसूर प्रांताला जोडण्यात आल्यानंतर बेळगावात त्या विरोधात पहिले मोठे आंदोलन झाले. या आंदोलनावेळी 17 जानेवारी 1956 रोजी चार आणि दुसऱ्या दिवशी …
Read More »भाई डॉ. एन. डी. पाटील यांचा स्मृतिदिन गांभीर्याने
बेळगाव : सीमातपस्वी सीमावासियांचे आधारवड भाई डॉ. एन. डी. पाटील यांचा पहिला स्मृतिदिन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात करण्यात आला. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी भाई एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी माजी …
Read More »संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन!
बेळगाव : जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सीमालढा अखंडपणे चालूच राहील. हा स्वाभिमान आम्हाला कोणी शिकवलेला नाही. हा स्वाभिमान, ऊर्जा आमच्यात नैसर्गिकपणे आलेली आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता टिकविण्यासाठी आमच्या हक्काच्या भूमीत जाण्यासाठी हा लढा आम्ही असाच चालू ठेवू, असा इशारा मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांनी दिला आहे. भाषावार …
Read More »जिल्हा प्रवेश बंदी, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची बाब : खास. धैर्यशील माने
बेळगाव : देशातील प्रत्येक नागरिकाला घटनेने संवैधानिक अधिकार दिले आहेत. मी सुद्धा या देशातील केंद्राचा एक लोकप्रतिनिधी आहे. मात्र संविधानिक अधिकार पायदळी तुडवत कर्नाटक सरकार मराठी माणसाची गळचेपी करत आहे. आज बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या हुतात्मा दिन कार्यक्रमाला जाण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली, यावरून कायदा सुव्यवस्थेच्या नावावर कर्नाटक …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतचे पिडिओ अरुण नाईक यांच्या विरोधात तक्रार
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतचे पिडिओ अरुण नाईक यांच्यासंदर्भात जिल्हा पंचायत सीईओ, तालुका पंचायत इओ व इडी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये येळ्ळूर ग्राम पंचायत विकास अधिकारी अरुण नाईक यांच्याबद्दल वेळेवर कार्यालयाला न येणे, अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्यांना मान सन्मान न देणे, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांना विश्वासात न …
Read More »हुतात्मा दिनाच्या पूर्व संध्येला समिती नेत्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक
बेळगाव : 17 जानेवारी 1956 रोजी बेळगावात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात झालेल्या गोळीबारात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता शहर समितीच्या वतीने हुतात्मा चौकात अभिवादन केले जाणार आहे. दरम्यान हुतात्मा दिनाच्या पूर्व संध्येला समिती नेते मंडळीनी खडे बाजार पोलीस अधिकारी अधिकाऱ्यांशी हुतात्मा …
Read More »हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन
बेळगाव : १७ जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मादिनी हुतात्म्यांचे बलिदान आठवून स्वाभीमान जागवणे आवश्यक आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी हुतात्म्यांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. याचे स्मरण ठेवून कोणत्याही आमिषांना बळी न पडता मराठी माणसाने १७ जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा दिनी हुतात्म्यांना अभिवादन करावे, असे आवाहन अॅड. सुधीर चव्हाण यांनी केले. …
Read More »एंजल फाउंडेशनच्या वतीने जलशुद्धी उपकरणाचे वितरण
बेळगाव : विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शुद्ध पाणी पिता यावे याकरिता एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी शहरातील सरकारी उच्च प्राथमिक शाळा नंबर 5 ला फाउंडेशनच्या वतीने जलशुद्धी उपकरणाचे वितरण केले आहे. सरकारी शाळेमध्ये अनेक मुले शिक्षण घेण्याकरिता येत असतात. त्यामुळे त्यांना या ठिकाणी शुद्ध पाणी पिता यावे आणि त्यांचे …
Read More »बेळगुंदी येथे रिंग रोड विरोधात जनआक्रोश आंदोलन
बेळगाव : शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करून या जमिनीवर सरकारने विविध प्रस्ताव मांडले आहेत. बायपास, रिंग रोड, रेल्वे ट्रॅक यासारख्या योजना अंमलात आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर जेसीबी फिरवण्याचा घाट सरकारने घातला आहे. या विरोधात शेतकऱ्यांसह इतर नागरिकांनीही तीव्र विरोध व्यक्त केला असून आज बेळगुंदी येथे रिंग रोड विरोधात जनआक्रोश …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta