Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

यमनापूर ग्रामस्थांचा हिंडाल्को विरोधात भव्य मोर्चा

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील यमनापूर गावच्या ग्रामस्थांनी हिंडाल्को कंपनीच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे फलक घेऊन हिंडाल्को कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यमनापूर गावातील ग्रामस्थांची जमीन, हिंडाल्को कंपनीने आपल्या व्यवसायासाठी घेतली आहे. मात्र कंपनीकडून गावातील लोकांना कोणतीही सुविधा देण्यात येत नसल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. यमनापूर गावातील …

Read More »

सडा किल्ल्यावर स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दुर्गसंवर्धन व स्वच्छता अभियान

  बेळगाव : छत्रपती शंभूराजे परिवार महाराष्ट्र व ‘ऑपरेशन मदत’ यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील कणकुंबी परिसरातील अतिदुर्गम भागात वसलेल्या सडा किल्ल्यावर स्वच्छ भारत अभियानांअंतर्गत दुर्गसंवर्धन व स्वच्छता अभियान राबविले. या कार्यक्रमाला कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातून स्वयंसेवक आले होते. महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, सिंधुदुर्ग येथून …

Read More »

बेळगाव ग्रामीणमध्ये नारळ आणि शपथ!

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागात लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून निवडणूक प्रचार होत आहे. लिंबू-नारळ इत्यादी वस्तूवर लोकांचा हात ठेवून शपथ घेऊन आतापासूनच मतांची याचना करीत काही राष्ट्रीय पक्षांची लोकं फिरत आहेत. प्रशासनाने याच्यावर कार्यवाही करून संबंधितांवर कडक शासन करावे. अन्यथा लोकांनी संतप्त होऊन चुकीचे पाऊल …

Read More »

रवी कोकीतकर हल्ला प्रकरणी तीन आरोपींना अटक

  बेळगाव : बेळगावचे श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकीतकर यांच्यावर गोळ्या झाडून फरार झालेल्या तीन आरोपींना पोलिसांनी चोवीस तासांत मोठ्या कारवाईत अटक केली. बेळगावच्या शहापूर भागातील अभिजीत सोमनाथ भातकांडे वय 41 रा. पाटील मळा बेळगाव यांच्यासह राहुल निंगाणी कोडचवड वय 32 रा. संभाजी गल्ली बस्तवाड, जोतिबा गंगाराम मूतगेकर वय 32 …

Read More »

हेल्प फॉर निडीने घेतली शरद पवार आणि अजित पवार यांची भेट

  बेळगाव : हेल्प फॉर निडी या बेळगावच्या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची तसेच आज शिनोळी येथे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांची ही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. कोल्हापूर मध्ये झालेल्या या भेटीत 2017 पासून हेल्प फॉर निडी …

Read More »

सुसंस्कृत, प्रगल्भ व्यक्ती रावजी पाटील

  येळ्ळूर हे पुरोगामी संघर्ष वृत्तीचे गाव म्हणून ओळखले जाते. कलिंगड, बासमती तांदूळ, मसूर, मोहरी, वाटाणा, मेरुल्या अश्या चवदार व पौष्टिक अन्नधान्य ही येळ्ळूरच्या काळ्या मातीची खासियत. या गावाने अनेक कर्तृत्ववान व्यक्तींची जडणघडण केली त्यापैकी श्रीयुत रावजी महादेव पाटील. लक्ष्मी व महादेव यशवंत पाटील यांचे लहान चिरंजीव. 3 एप्रिल 1947 …

Read More »

उद्या निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान; आनंदवाडी आखाडा सज्ज

  बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्यातर्फे उद्या रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता आनंदवाडी कुस्ती आखाडा, हिंदवाडी बेळगाव येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. सदर कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती भांदूर गल्ली तालमीचा कर्नाटक केसरी पै. नागराज बसीडोनी आणि पंजाबचा नॅशनल चॅम्पियन …

Read More »

हिंदुत्ववादी नेते श्रीराम सेना जिल्हा अध्यक्ष रवी कोकीतकर यांच्यावर गोळीबार

  बेळगाव : उद्या होणाऱ्या धर्मसभेची तयारी करून आज सायंकाळी हिंडलगा येथील आपल्या घराकडे जात असताना मराठी शाळा हिंडलगा समोर स्पीड ब्रेकरला गाडी स्लो झाल्यानंतर हिंदुत्ववादी नेते हिंदु राष्ट्र सेनेचे नेते आणि श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष रवी कोकीतकर यांच्यावर दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केला असून त्या गोळीबारात दोन गोळ्या कोकीतकर यांच्या तोंडाला …

Read More »

कडोलीत उद्या होणार साहित्याचा जागर!

  बेळगाव : कडोली येथील श्री दुरदुंडेश्वर मठाच्या आवारामध्ये कडोली साहित्य संघातर्फे आयोजित ३८ वे साहित्य संमेलन रविवार दि. ०८/०१/२३ रोजी होणार असुन अध्यक्षस्थानी परभणीचे मा. नितीन सावंत असणार आहेत. तर बेळगाव सीमाभागातील कडोली गावामध्ये प्रथम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होऊन अत्यंत भव्यदिव्य व यशस्वीरीत्या भरवले जाणार आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून …

Read More »

मतदार यादीतून देखील मराठीला हद्दपार!

  बेळगाव : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून यावेळी देखील मराठीला हद्दपार करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडे विचारणा केली असता अद्याप मराठी मतदारयादीची छपाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात मराठी भाषिक मतदार आहेत. त्यापैकी बेळगांव ग्रामीण, उत्तर, दक्षिण, खानापूर तसेच निपाणी मतदारसंघात मराठी भाषिक मतदारांची संख्या जास्त …

Read More »