Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव

वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण केले मुलाने

  बेळगाव : गेल्या नऊ वर्षापासून कृष्णा लक्ष्मण देवगाडी याने इंडियन कराटे क्लब मच्छे येथे कराटेचे प्रशिक्षण घेतले. कृष्णा याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी सुवर्णपदके पटकावले आहेत याकरिता त्याला कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे प्रशिक्षण लाभत आहे. कृष्णाचे वडील हे सुद्धा कराटेचे प्रशिक्षण घेत होते …

Read More »

ऍड. सुधीर चव्हाण यांचा सकल मराठा समाजाच्यावतीने सन्मान

  बेळगाव : बेळगाव बार असोसिएशन वकील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वकील सुधीर चव्हाण यांचा सकल मराठा समाजाचे नेते आणि विमल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी सन्मान केला. जवळपास तीन हजार हून अधिक वकील सदस्य असलेल्या बेळगाव बार असोसिएशन या प्रतिष्ठित संघटनेच्या अध्यक्षपदी क्रियाशील कार्यकर्ते, वकील सुधीर चव्हाण यांची …

Read More »

बेळगाव शहर कार्यक्षेत्रातील निरीक्षकांच्या बदल्या

  बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय कार्य क्षेत्रातील निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे. विशेषता बेळगाव शहरातील पोलीस स्थानकात नवीन पोलीस निरीक्षक नियुक्त करण्यात आला आहे. बेळगाव शहरात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मार्केट पोलीस स्थानकात महांतेश दामन्नावर, माळ मारुती पोलीस स्थानकात जे एम कालिमिरची, कॅम्प पोलीस स्थानकात अल्ताफ मुल्ला, शहरातील …

Read More »

महाराष्ट्र राज्य उचगाव प्रकरणी म. ए. समितीच्या ८ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : दि. २८/०७/२०१४ रोजी उचगाव ग्रा. पं. चे सेक्रेटरी सदयाप्पा बसाप्पा तारेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काकती पोलिसांनी मनोहर लक्ष्मण होनगेकर, अरुण अप्पाजी जाधव, विवेक सुभाष गिरी, अनंत शंकर देसाई, संतोष गुंडू पाटील, गणपती शंकर पाटील, भास्कर कृष्णा कदम व राजेंद्र वसंत देसाई या सर्वाच्या विरोधात कलम १४३, १४७, …

Read More »

बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुधीर चव्हाण यांची निवड

  बेळगाव : तत्कालीन बार असोसिशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची सनद रद्द झाल्याने बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष पद काही दिवसापासून रिक्त होते. संघटनेच्या घटनेनुसार कार्यकारिणीने नवीन अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते ऍड. सुधीर चव्हाण यांची निवड केली. जवळपास तीन हजार हून अधिक वकील सदस्य असलेल्या बेळगाव बार असोसिएशन या …

Read More »

ग्राम वन केंद्रांच्या ऑपरेटर्सची बेळगावात निदर्शने

  बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणीसाठी अत्यल्प रक्कम देऊन त्यावरही जीएसटी आकारण्यात येत असल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ग्राम वन केंद्रांच्या ऑपरेटर्सनी केंद्र बंद करून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. राज्यातील गृहलक्ष्मी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ग्रामवन केंद्रांच्या ऑपरेटर्सना प्रति नोंदणीसाठी 20 रुपये देण्यात येतात. मात्र त्यातील 8 रुपये जीएसटी, टीडीएससाठी कपात …

Read More »

उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदी दाम्पत्याची बिनविरोध निवड

  बेळगाव : उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदी दाम्पत्याची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीमध्ये महिला आरक्षण असल्याने मथुरा बाळकृष्ण तेरसे यांची अध्यक्षपदी तर मथुरा यांचे पती बाळकृष्ण खाचू तेरसे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यात असलेले उचगाव गाव आहे. ८००० जवळपास लोकसंख्या असलेल्या या गावात ग्रामपंचायत निवडणूक पार …

Read More »

क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णांची मूर्ती चांगल्या जागी बसवा!

  बेळगाव : मच्छे (ता. बेळगाव) येथे नगरपंचायतीसमोरच्या गावातील सोसायटीच्या जागेत ५ जुलै रोजी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ही मूर्ती सदर जागेतून हटवून मोक्याच्या आणि चांगल्या जागेत बसवण्यात यावी, अशी मागणी समस्त मच्छे गावकऱ्यांनी केली आहे. आज नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांसह बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांना याबाबत …

Read More »

श्री सोन्या मारुती मंदिरातर्फे गो-रक्षकांचा सत्कार

  बेळगाव : शहरातील आरटीओ सर्कल येथील पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिरातर्फे आयोजित आपल्या देशात मातृ स्वरूप मानल्या जाणाऱ्या गाईंच्या रक्षणकर्त्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिर येथे गेल्या शनिवारी दुपारी आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. यावेळी …

Read More »

बेळगावच्या तनिष्का आणि आयुषी राज्यस्तरावर चमकल्या

  बेळगाव : बेळगाव येथील तनिष्का कपिल काळभैरव हिने राशी व्ही रावचा सरळ गेममध्ये सहज पराभव करून बेंगळुरू येथे कॅनरा युनियनने आयोजित केलेल्या राज्य क्रमवारीत टेबल टेनिस स्पर्धेत अंडर-13 मुलींच्या एकेरी विजेतेपदावर कब्जा केला. बेळगाव येथील प्रशिक्षक संगम बैलूर यांच्याकडून प्रशिक्षण घेत असलेल्या तनिष्काने राशीविरुद्धच्या सामन्यात ११-६ आणि ११-५ असे …

Read More »