बेळगाव : आनंदनगर, वडगाव येथील परशराम घाडी व चंद्रकला घाडी या दाम्पत्याने मरणोत्तर देहदान, नेत्रदान व त्वचा दानाचा संकल्प सोडला आहे. परशराम घाडी हे बेळगाव शहरातील विविध संस्थेत कार्यरत आहेत. एक यशस्वी विमा एजंट म्हणूनही ते ओळखले जातात. सध्या ते मुख्य जीवन विमा सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. सामाजिक …
Read More »कॅपिटल वन आयोजित एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न
बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेच्या सांस्कृतिक दालना अंतर्गत गेली अकरा वर्षे एकांकिका स्पर्धेचे आयोजन दोन वेगवेगळ्या स्वतंत्र गटात म्हणजेच बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय गट आणि आंतर राज्य भव्य खु ला गट असे करण्यात येते. सदर स्पर्धेच्या आयोजनामध्ये संस्थेने कालानुरूप बदल करण्यात आले असून बेळगाव जिल्ह्यातील नाट्य कलाकारांना आणि …
Read More »तळीरामांनी रिचवले कोट्यावधी रुपयांचे मद्य!
बेळगाव : नववर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यात 7 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मद्याची विक्री झाली आहे. तळीरामांनी कोट्यावधी रुपयांचे मद्य रिचवले असून गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक प्रमाणात मद्याची विक्री झाली आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे अबकारी विभागाला उद्दिष्ट गाठता आले नाही. यंदा मद्यविक्रीचे उद्दिष्ट पार झाले आहे. …
Read More »बैलहोंगलजवळ भीषण अपघात : दोघांचा मृत्यू
बेळगाव : सोमवारी रात्री बैलहोंगल-इंचळ रस्त्यावर झालेल्या दुचाकीस्वारांच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. मृत व जखमी हे मुतवाड व व्हन्नूर येथील ग्रामस्थ असल्याची माहिती आहे. मात्र अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस सूत्रांनी सांगितले की, प्रत्येकी दोन दुचाकींवर तीन जण स्वार होते. पोलीस …
Read More »शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला रिंगरोड रद्द करावा
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : बेळगाव तालुक्यात होणाऱ्या रिंगरोडला शेतकऱ्यांनी चाबूक मोर्चा काढून आपला विरोध दर्शविला आहे. सरकारने हा रिंगरोड रद्द करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शहरातील वाहनाची कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोड व्यतिरिक्त फ्लाय ओव्हर करून ही समस्या संपवता येते, वाढत्या वाहनकोंडीमुळे अनेक …
Read More »कॉ. कृष्णा मेणसे यांना यंदाचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार
आजरा : गेली 80 वर्षांहून अधिक काळ श्रमिक, कष्टकरी, कामगार शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे आणि बिदर-भालकी, बेळगांव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी आपले आयुष्य वेचणारे कॉ. कृष्णा मेणसे यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना.गव्हाणकर स्मृती पुरस्कार देण्याचा निर्णय आज येथे झालेल्या पुरस्कार व स्मारक समितीच्या बैठकीत …
Read More »गॅस गळतीने कसाई गल्लीत घराला आग
बेळगाव : गॅस गळतीने घराला आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी कसाई गल्ली येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. विनायक बारटक्के व त्यांचे कुटुंबीय भाडोत्री रहात असलेल्या घराला रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास गॅस गळतीने आग लागली. कौलारू घर असल्यामुळे छत …
Read More »बैलहोंगल येथील अनिगोळ येथे दगडाने ठेचून एकाची हत्या
बेळगाव : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवार दि. 1 जानेवारी रोजी रात्री बैलहोंगल तालुक्यात एकाचा खून झाल्याची घटना घडली. बैलहोंगल येथून जवळच असलेल्या अनिगोळ येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मंजुनाथ सुंगर (45) याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 25 अजय हिरेमठ हा संशयित आरोपी आहे. मंजुनाथ …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक
बेळगाव : सोमवार दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी ठीक दोन वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हरब्रिज) येथे प्रस्तावित बेळगाव तालुक्यात होणाऱ्या रिंग रोड रद्दकरण्यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, सर्व शेतकऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन …
Read More »स्मशानभूमीत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचा सत्कार
बेळगाव : बेळगाव शहराच्या सदाशिवनगर येथील स्मशनभूमीत गेल्या 43 वर्षापासून सेवा बजावणाऱ्या मल्लाप्पा धुंडपणावर यांचा सेवा निवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. सदाशिवनगर स्मशानभूमी सुधारणा मंडळच्या वतीने महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ तसेच माजी नगरसेवक बाबूलाल मुजावर नगरसेवक शंकर पाटील, युवा समाजसेवक आर्यन मोरे, माजी महापौर विजय मोरे यांच्या हस्ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta